Maharashtra Weather:मुंबई कोकणात मुसळधार पावसाचा IMD ने दिला इशारा

Maharashtra Weather News :राज्यात सध्या पावसाने झोडपले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई व कोकण विभाग रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 4 दिवसांत या भागात वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसाची शक्यता …

Maharashtra Weather:मुंबई कोकणात मुसळधार पावसाचा IMD ने दिला इशारा

Maharashtra Weather News :राज्यात सध्या पावसाने झोडपले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई व कोकण विभाग रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 4 दिवसांत या भागात वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

ALSO READ: रायगड, रत्नागिरीसह पुणे घाट परिसरात पुढील 24 तासांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आज बुधवारी 25 जून रोजी आकाश ढगाळ असणार तसेच मुंबईत हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

ALSO READ: राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईत हायटाईडचा इशारा

ठाणे, कल्याण, डोंबिवली, रायगड आणि पालघर येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे.सततच्या पावसामुळे घाटमाथ्यावरील तलाव भरले आहे. धरणांमधून पाणी वाहत आहे. धरण्यातून पाणी सोडल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. पुणे परिसरातील घाटमाथा आणि दक्षिण कोकणात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  

 Edited By – Priya Dixit

ALSO READ: मुंबईत मुसळधार पावसामुळे कहर, रेल्वे-मेट्रो सेवा ठप्प, ऑरेंज अलर्ट जारी

Go to Source