हवामान खात्याने मुंबई (mumbai), ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (orange alert) जारी केला आहे आणि पुढील काही तासांत मुसळधार (mumbai rains) ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईच्या उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात पावसाची तीव्रता जास्त असेल.मध्य प्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे आणि समुद्रात आणि किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण कोकण किनाऱ्यावर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भात, हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा (monsoon) इशारा देण्यात आला आहे. पुणे घाट परिसर आणि सातारा घाट परिसरासाठीही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान खात्याच्या (IMD) कुलाबा केंद्राने सोमवारी सकाळी 8:30 ते मंगळवारी सकाळी 8:30 पर्यंत 12.2 मिमी पावसाची नोंद केली, तर सांताक्रूझ केंद्राने 38.2 मिमी पावसाची नोंद केली. पवई, सांताक्रूझ, वांद्रे, अंधेरी, कुर्ला भागात मुसळधार पाऊस पडत आहे.हेही वाचानवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफबेस्टचा बस मार्ग क्रमांक 1 पुन्हा सुरू होणार
मुंबईसह ‘या’ भागात अति मुसळधार पावसाचा इशारा