कारसेवकांच्या अयोध्येतील संघर्षाला उजाळा

1200 जणांच्या तुकडीत महिलांचाही सहभाग बेळगाव : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवार दि. 22  रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील कारसेवकांनी आठवणींना उजाळा दिला आहे. या आंदोलनात बेळगाव येथून 1200 हून अधिक कारसेवक अयोध्येत पोहोचले होते. ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते विलास पवार यांनी या आठवणींना उजाळा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आदेशानुसार बेळगाव […]

कारसेवकांच्या अयोध्येतील संघर्षाला उजाळा

1200 जणांच्या तुकडीत महिलांचाही सहभाग
बेळगाव : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात सोमवार दि. 22  रोजी रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील कारसेवकांनी आठवणींना उजाळा दिला आहे. या आंदोलनात बेळगाव येथून 1200 हून अधिक कारसेवक अयोध्येत पोहोचले होते. ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते विलास पवार यांनी या आठवणींना उजाळा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आदेशानुसार बेळगाव येथील शेकडो बजरंगी आंदोलनात सहभागी झाले होते. अयोध्येला रवाना होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून ही तुकडी रेल्वेने अयोध्येला गेली होती. ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे’, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत बजरंग दल कार्यकर्त्यांच्या तुकडीत 130 महिलांचाही समावेश होता. इटारसी रेल्वेस्टेशनवर रेल्वे बदलावी लागली. पुढे फैजाबादहून हे कारसेवक अयोध्येकडे निघाले. नैनी स्टेशनवर सर्वांना अटक झाली. तरीही मोठ्या हिमतीने हे कारसेवक अयोध्येत पोहोचले व सेवेत भाग घेतला. गोळीबार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. अशोक सिंघल जखमी झाले होते. तरीही योग्यवेळी कारसेवा यशस्वी करून आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी बेळगावला परतलो, अशा शब्दात विलास पवार यांनी आपले अनुभव कथन केले.