बैलहोंगल तालुक्यात चार लाखांचा बेकायदा दारूसाठा जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव होळेहोसूर (ता. बैलहोंगल) येथील एका घरावर छापा टाकून बैलहोंगल व कित्तूर पोलिसांनी 890 लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे. होळेहोसूर येथील रुद्राप्पा तोरगल यांच्या घरात सुमारे 4 लाखांचा बेकायदा दारूसाठा करण्यात आला होता. यासंबंधीची माहिती मिळताच बैलहोंगल व कित्तूर पोलिसांनी संयुक्तपणे घरावर छापा […]

बैलहोंगल तालुक्यात चार लाखांचा बेकायदा दारूसाठा जप्त

प्रतिनिधी/ बेळगाव
होळेहोसूर (ता. बैलहोंगल) येथील एका घरावर छापा टाकून बैलहोंगल व कित्तूर पोलिसांनी 890 लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे.
होळेहोसूर येथील रुद्राप्पा तोरगल यांच्या घरात सुमारे 4 लाखांचा बेकायदा दारूसाठा करण्यात आला होता. यासंबंधीची माहिती मिळताच बैलहोंगल व कित्तूर पोलिसांनी संयुक्तपणे घरावर छापा टाकून सुमारे 3 लाख 83 हजार 712 रुपये किमतीचे ओरिजिनल चॉईस व्हिस्की व 17,660 रुपये किमतीची मॉकिन्टोश चॉईस व्हिस्की जप्त करण्यात आली आहे.
बैलहोंगल पोलिसांनी एकूण 99 बॉक्स दारूसाठा जप्त केला आहे. यासंबंधी नागाप्पा गंगाप्पा गोरकोळ्ळ, मूळचा राहणार चिवटगुंडी, सध्या रा. एम. के. हुबळी, रुद्राप्पा भीमाप्पा तोरगल, रा. होळेहोसूर यांच्यावर कर्नाटक अबकारी कायदा 32 व 34 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून हा साठा त्यांनी कोठून व कोणासाठी आणला? याची चौकशी करण्यात येत आहे.