बेळगावहून गोव्यात येणारे बेकायदेशीर गोमांस जप्त

पिकअपसह चालकाला अटक: अन्य संशयितांचा शोध जारी वाळपई : बेळगाव येथून बेकायदेशीर गोमांस घेऊन गोव्याकडे येणाऱ्या वाहनावर केरी येथे छापा घालून वाळपई पोलिसांनी सुमारे 6 लाख ऊपयांचे तीन टन गोमांस जप्त करून वाहन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बेळगाव येथील मेहबूब सुभानी याला अटक करण्यात आली आहे. बेळगावहून गोव्याकडे येणारी केए 26, बी 4377 क्रमांकाची पिकअप केरी येथील तपासणी नाक्मयावर अडवून […]

बेळगावहून गोव्यात येणारे बेकायदेशीर गोमांस जप्त

पिकअपसह चालकाला अटक: अन्य संशयितांचा शोध जारी
वाळपई : बेळगाव येथून बेकायदेशीर गोमांस घेऊन गोव्याकडे येणाऱ्या वाहनावर केरी येथे छापा घालून वाळपई पोलिसांनी सुमारे 6 लाख ऊपयांचे तीन टन गोमांस जप्त करून वाहन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बेळगाव येथील मेहबूब सुभानी याला अटक करण्यात आली आहे. बेळगावहून गोव्याकडे येणारी केए 26, बी 4377 क्रमांकाची पिकअप केरी येथील तपासणी नाक्मयावर अडवून तिची तपासणी केली असता त्यामध्ये तीन टन बेकायदेशीर गोमांस असल्याचे उघडकीस आले. तपासणी नाक्मयावरील पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक दत्तात्रय गावस यांनी अधिक चौकशी केली असता या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात वाहनचालक मेहबूब सुभानी (29, राहणारा मदिना गल्ली, न्यू गांधीनगर) याला अपयश आले. यामुळे त्याला तीन टन गोमांस व गाडीसह ताब्यात घेण्यात आले.
 केरी येथे कारवाई
वाळपई पोलीसस्थानकावर नंतर यासंदर्भात गुन्हा नोंद करून मेहबूब सुभानी याला अटक करण्यात आल्याची माहिती वाळपई पोलिसांनी दिली. वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सनिशा नाईक यांनी हा गुन्हा नोंदविलेला आहे.आज सोमवारी साजऱ्या होणाऱ्या ईदसाठी कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोमांस गोव्यामध्ये येण्याची शक्मयता होती. या संदर्भात विशेष नजर ठेवण्यात आली होती. सदर वाहन बेळगाव भागातून गोमांस भरून गोव्याकडे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदर वाहनावर केरी या ठिकाणी छापा मारुन ते ताब्यात घेण्यात आले.
अन्य संशयितांचा शोध 
गेल्यावषी अशाच प्रकारे पोलिसांनी बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणारी वाहने ताब्यात घेतली होती. त्याचप्रमाणे बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालच्या या प्रकरणी सध्यातरी चालक मेहबूब सुभानी याला अटक करण्यात आली असली तरीसुद्धा या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे. ज्या भागातून हे गोमांस आणण्यात आले आहे, त्यामध्ये आणखी काही अन्य संशयित गुंतल्याची शक्मयता आहे. त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जप्त करण्यात आलेल्या गोमांसची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समवेत पंचनामा करून विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली पिकअप वाळपई पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.