मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला 130 कोटींची देणगी

मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने आयआयटी मुंबईला (mumbai) तब्बल 130 कोटी रुपयांची देणगी (donation) दिली आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या (motilal oswal foundation) या ऐतिहासिक सहकार्यामुळे आता आयआयटी मुंबई (iit bombay) या ठिकाणी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा स्थापना होण्यास मदत होणार आहे. राष्ट्र उभारणी आणि आर्थिक क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे.‘एमओएफएसएल’चे सह-संस्थापक मोतीलाल ओस्वाल आणि रामदेव अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या 10 टक्के इक्विटी, ज्याचे मूल्य सध्या चार हजार कोटी आहे. भारतीय शैक्षणिक संस्थेसाठी हे मोठे योगदान समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाऊंडेशन आणि आयआयटी बॉम्बे यांच्या या सामंजस्य करारांतर्गत मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये तबब्ल 1 लाख 1.2 लाख चौरस फूट क्षेत्रफळात स्थापन करण्यात येणार आहे. हा अत्याधुनिक शैक्षणिक प्रोजेक्ट नावीन्य आणि संशोधनाचे केंद्र म्हणून काम करणार आहे. शैक्षणिक उत्कृष्टता, प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे या माध्यमातून मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईला जागतिक दर्जाची प्रतिभा तयार करण्यासाठी मदत करणार आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाला आणखी सक्षम करेल. दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई येथील मोतीलाल ओस्वाल सेंटर फॉर कॅपिटल मार्केट्सची कल्पना भारतीय वित्तीय क्षेत्राचा विकास आणि वाढ सक्षम करण्यासाठी उच्च-स्तरीय क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे.हे बहुविद्याशाखीय अर्थशास्त्र, व्यवस्थापन, ऑपरेशन्स रिसर्च, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गणित यासारख्या क्षेत्रांतून कौशल्य प्राप्त करेल. एमओसीएमची योजना अंडरग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरांवर अनेक शैक्षणिक कार्यक्रमाची आहे. केंद्राने ऑनलाइन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाची कल्पना देखील केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील डेटासह व्यावहारिक प्रशिक्षण आणि आर्थिक क्षेत्राचे भविष्य घडविण्याची संधी प्रदान करणार आहे. दरम्यान, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी या महत्त्वाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ही देणगी आम्हाला आमच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रगती करण्यास मदत करेल. तसेच जी ग्राउंडब्रेकिंग संशोधनाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. भांडवली बाजारासाठी मोतीलाल ओस्वाल केंद्राची स्थापना हा आयआयटी बॉम्बेसाठी महत्त्वाचा क्षण आहे. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वात योगदान देण्याच्या आणि जागतिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी हे महत्वाचं पाऊल ठरेल. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या दूरदर्शी योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत.”हेही वाचा राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात मुंबई गणेश विसर्जन : ठाणे, नवी मुंबईसह मुंबईत अवजड वाहनांना बंदी

मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला 130 कोटींची देणगी

मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनने आयआयटी मुंबईला (mumbai) तब्बल 130 कोटी रुपयांची देणगी (donation) दिली आहे. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या (motilal oswal foundation) या ऐतिहासिक सहकार्यामुळे आता आयआयटी मुंबई (iit bombay) या ठिकाणी जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा स्थापना होण्यास मदत होणार आहे. राष्ट्र उभारणी आणि आर्थिक क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल समजलं जात आहे. ‘एमओएफएसएल’चे सह-संस्थापक मोतीलाल ओस्वाल आणि रामदेव अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या फाउंडेशनकडून ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या 10 टक्के इक्विटी, ज्याचे मूल्य सध्या चार हजार कोटी आहे. भारतीय शैक्षणिक संस्थेसाठी हे मोठे योगदान समजलं जात आहे. मोतीलाल ओस्वाल फाऊंडेशन आणि आयआयटी बॉम्बे यांच्या या सामंजस्य करारांतर्गत मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये तबब्ल 1 लाख 1.2 लाख चौरस फूट क्षेत्रफळात स्थापन करण्यात येणार आहे.हा अत्याधुनिक शैक्षणिक प्रोजेक्ट नावीन्य आणि संशोधनाचे केंद्र म्हणून काम करणार आहे. शैक्षणिक उत्कृष्टता, प्रगत प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे या माध्यमातून मोतीलाल ओस्वाल नॉलेज सेंटर आयआयटी मुंबईला जागतिक दर्जाची प्रतिभा तयार करण्यासाठी मदत करणार आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाला आणखी सक्षम करेल. दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबई येथील मोतीलाल ओस्वाल सेंटर फॉर कॅपिटल मार्केट्सची कल्पना भारतीय वित्तीय क्षेत्राचा विकास आणि वाढ सक्षम करण्यासाठी उच्च-स्तरीय क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे.हे बहुविद्याशाखीय अर्थशास्त्र, व्यवस्थापन, ऑपरेशन्स रिसर्च, कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि गणित यासारख्या क्षेत्रांतून कौशल्य प्राप्त करेल. एमओसीएमची योजना अंडरग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट स्तरांवर अनेक शैक्षणिक कार्यक्रमाची आहे. केंद्राने ऑनलाइन पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाची कल्पना देखील केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील डेटासह व्यावहारिक प्रशिक्षण आणि आर्थिक क्षेत्राचे भविष्य घडविण्याची संधी प्रदान करणार आहे.दरम्यान, आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे यांनी या महत्त्वाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “ही देणगी आम्हाला आमच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रगती करण्यास मदत करेल. तसेच जी ग्राउंडब्रेकिंग संशोधनाला चालना देण्यासाठी आवश्यक आहे. भांडवली बाजारासाठी मोतीलाल ओस्वाल केंद्राची स्थापना हा आयआयटी बॉम्बेसाठी महत्त्वाचा क्षण आहे. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वात योगदान देण्याच्या आणि जागतिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी हे महत्वाचं पाऊल ठरेल. मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनच्या दूरदर्शी योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत.”हेही वाचाराष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघातमुंबई गणेश विसर्जन : ठाणे, नवी मुंबईसह मुंबईत अवजड वाहनांना बंदी

Go to Source