गोव्यातील ‘सूर्यकिरण हॉटेल’ला ‘आयआयबी एक्सलन्स’ पुरस्कार

गोव्यात सर्वोत्कृष्ट हॉटेल असण्याचा मान बेळगाव : गोव्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात राहण्याची उत्तम सुविधा व रुचकर पदार्थांचा आस्वाद देणाऱ्या गोव्यातील ‘सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल’ला ‘आयकॉन्स ऑफ इंडियन बिझनेसेस’ (आयबी) या मॅक्झिनतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘आयआयबी इंडिया बिझनेस एक्सलन्स’ पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारामुळे सूर्यकिरण हेरिटेज हॉटेलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पर्यटकांना उत्तम सेवा, रुचकर […]

गोव्यातील ‘सूर्यकिरण हॉटेल’ला ‘आयआयबी एक्सलन्स’ पुरस्कार

गोव्यात सर्वोत्कृष्ट हॉटेल असण्याचा मान
बेळगाव : गोव्यात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात राहण्याची उत्तम सुविधा व रुचकर पदार्थांचा आस्वाद देणाऱ्या गोव्यातील ‘सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल’ला ‘आयकॉन्स ऑफ इंडियन बिझनेसेस’ (आयबी) या मॅक्झिनतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘आयआयबी इंडिया बिझनेस एक्सलन्स’ पुरस्कार दिला आहे. या पुरस्कारामुळे सूर्यकिरण हेरिटेज हॉटेलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पर्यटकांना उत्तम सेवा, रुचकर पदार्थांचा आस्वाद देणारे सर्वोत्तम हेरिटेज हॉटेल म्हणून सूर्यकिरणचा गौरव केला आहे.
बेंगळूरच्या यशवंतपूर येथील ताज हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सूर्यकिरण हेरिटेज हॉटेलला हा पुरस्कार प्रदान केला. हॉटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामुळे सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले आहे. आयआयबीतर्फे दरवर्षी देशभरातील उत्कृष्ट सेवा देणाऱ्या हॉटेल, रिसॉर्टचे सर्वेक्षण केले जाते. यामध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देणाऱ्या गोव्याचाही समावेश असतो. गोव्यात असलेल्या शेकडो हॉटेल्सचे सर्वेक्षण करून राहण्यासाठी उत्तम सुविधा, प्रसन्न वातावरण, विनम्र सेवा, खाद्यपदार्थांचा दर्जा अशा विविध निकषांवर आयआयबीचे तज्ञ विजेत्यांची निवड करतात. यंदा या सर्व निकषांची पूर्तता करत ‘सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल’ने गोव्यात सर्वोत्कृष्ट हॉटेल असण्याचा मान मिळविला.
देशभरातल्या पर्यटकांकडून मिळाली दाद
हा पुरस्कार आमच्यासाठी देशभरातल्या पर्यटकांकडून मिळालेली दाद असून त्याचा आम्ही आदर करतो. या पुरस्काराने आम्हाला पर्यटकांची सेवा करण्याची प्रेरणा दिली असून यापुढे अधिक चांगली सेवा देण्याचा आणि पर्यटकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. हा पुरस्कार ‘सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल’मध्ये सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मेहनतीचे फळ आहे, अशा भावना हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक प्रीतम बिजलानी व सई ठाकुर-बिजलानी यांनी व्यक्त केल्या आहेत. सूर्यकिरणमधील सेवांचा अनुभव घेतलेल्या पर्यटकांचेही या पुरस्कारात योगदान असून त्यांनी प्रत्यक्ष व ऑनलाईन पद्धतीने सातत्याने दिलेल्या अभिप्रायामुळे हॉटेलचा दर्जा सुधारण्यास मदत झाली आहे, असेही प्रीतम बिजलानी यांनी नमूद केले.