कान्स चित्रपट महोत्सवात ‘इफ्फी’ पोस्टरचे अनावरण

पणजी : चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा उत्सव मानला जाणाऱ्या 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवाला फ्रेंच रिव्हेएरा येथे नुकतीच सुरूवात झाली. त्यात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कान्स महोत्सवाच्या भारत पर्व कार्यक्रमात गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आणि नियोजित जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ग्लोबल एंटरटेनमेंट […]

कान्स चित्रपट महोत्सवात ‘इफ्फी’ पोस्टरचे अनावरण

पणजी : चित्रपटसृष्टीचा सर्वात मोठा उत्सव मानला जाणाऱ्या 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवाला फ्रेंच रिव्हेएरा येथे नुकतीच सुरूवात झाली. त्यात भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कान्स महोत्सवाच्या भारत पर्व कार्यक्रमात गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आणि नियोजित जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ग्लोबल एंटरटेनमेंट अँड मीडिया समिटच्या उद्घाटन आवृत्तीच्या पोस्टरचे अनावरण भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाजू यांच्यासह चित्रपट निर्माते अशोक अमृतराज, रिची मेहता, गायक शान, अभिनेता राजपाल यादव, चित्रपट दिग्गज बॉबी बेदी आदी उपस्थित होते.