केंद्रात सत्तेवर आल्यास एमएसपी कायदा करू
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे प्रतिपादन : कृषी अवजारांचे वितरण
बेळगाव : देशाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कृषीमालाला हमीभाव देणे सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलनही सुरू आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास एमएसपी कायदा अंमलात आणण्याची ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. बुधवारी सुवर्ण विधानसौधच्या आवारात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व कृषी खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव विभागातील लाभार्थींना कृषी अवजारांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्यातील 223 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. यापैकी 196 तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. 18 हजार 171 कोटी रुपयांची पीकहानी झाली आहे. भरपाईसाठी केंद्र सरकारकडे अनेक वेळा अर्जविनंत्या करूनही केंद्राने कसलीच मदत केली नाही. प्रत्येकी 2 हजार रुपयेप्रमाणे राज्य सरकारने 631 कोटी रुपयांची तात्पुरती मदत दिली आहे. याआधीच्या सरकारने शेततळे योजनाच स्थगित केली होती. यंदा 200 कोटी रुपये त्यासाठी देऊन कृषीभाग्य योजनेला पुन्हा चालना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बेळगाव विभागातील 2700 शेतकऱ्यांना 13 कोटी 12 लाख रुपयांचे विविध कृषी अवजारे देण्यात येत आहेत. राज्यात 900 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून शेतकऱ्यांना कृषी अवजारे पुरविली जात आहेत. आधुनिक यंत्रसामग्री पुरवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना शेती करताना आधुनिक पद्धतीचा अवलंब करणे सोयीचे ठरले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, सैनिक, कामगार, शिक्षक व शेतकरी समाजाचे आधारस्तंभ आहेत. शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कृषी खात्याकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. ऊसतोडणी यंत्र, ट्रॅक्टरसह कोट्यावधी रुपयांची यंत्रोपकरणे दिली जात आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर कर्नाटकातही ऊस, फळे, भाजीपाल्याच्या उत्पन्नासह दुग्ध व्यवसायात वाढ होत आहे. या भागातही शेतकरी रेशीम उत्पादन घेत आहे, ही चांगली गोष्ट आहे. कळसा-भांडुरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार वचनबद्ध आहे. नागरिकांच्या सहकार्याने हे साध्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी कृषीमंत्री एन. चेलुवरायस्वामी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, विश्वास वैद्य, बाबासाहेब पाटील, महांतेश कौजलगी, बागलकोटचे आमदार एच. वाय. मेटी, कृषी खात्याचे सचिव अनबुकुमार, आयुक्त वाय. एस. पाटील आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना नांगर, ट्रॅक्टर, ऊसतोडणी यंत्र, पॉवर ट्रिलर, रोटोवेटर व इतर साहित्य वाटप करण्यात आले. बेळगाव विभागातील सात जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.
Home महत्वाची बातमी केंद्रात सत्तेवर आल्यास एमएसपी कायदा करू
केंद्रात सत्तेवर आल्यास एमएसपी कायदा करू
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे प्रतिपादन : कृषी अवजारांचे वितरण बेळगाव : देशाला अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कृषीमालाला हमीभाव देणे सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलनही सुरू आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास एमएसपी कायदा अंमलात आणण्याची ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. बुधवारी सुवर्ण विधानसौधच्या आवारात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व कृषी खात्याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बेळगाव […]