Cooking Tips: कारल्याची भाजी कडू झाली असल्यास या टिप्स अवलंबवा , भाजी कडू लागणार नाही
बहुतेक डॉक्टर उन्हाळ्याच्या हंगामात कारले खाण्याचा सल्ला देतात. कारल्यामध्ये असे अनेक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कारल्याचे सेवन अनेक रोगांवर केले जाते. कारला ही एक भाजी आहे जी योग्य प्रकारे तयार करणे खूप महत्वाचे आहे. कारला खायला खूप चविष्ट असला तरी तो नीट तयार केला नाही तर त्याची चव एकदम कडू लागते.
कारले आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लहान मुले कारले खात नाही. कारले बनवताना कडू राहू नये या साठी या टिप्स अवलंबवा.ज्या वापररल्याने कारल्यातील कडूपणा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.
मीठ लावा:
कारले बनवण्याआधी, कारल्याला सुमारे ३० मिनिटे मीठ नीट लावा. मिठात आढळणारे खनिज कारल्याचा कडू रस काढून टाकण्यास मदत करतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांना मिठाच्या पाण्यात भिजवूनही ठेवू शकता.
बिया काढून टाका-
कारल्याच्या बियांमध्ये खूप कडूपणा असतो. अशा परिस्थितीत कडबा कापताना त्याच्या बिया काढून टाका. बिया काढून टाकल्यानंतर त्याचा कडूपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
नीट सोलून घ्या –
कारले तयार करण्यापूर्वी नीट सोलून घ्या .असे केल्याने त्याचा कडवटपणा कमी होईल. कारल्याच्या सालीमध्ये जास्तीत जास्त कडूपणा आढळतो. अशा स्थितीत त्याची जाड साले काढा.
दह्यात भिजवून ठेवा
कारले बनवण्यापूर्वी एक तास भर कारले दह्यात भिजवून ठेवा असं केल्याने त्यातील कडवटपणा कमी होईल. बनवताना कारले दह्यातून काढा आणि भाजी बनवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited by – Priya Dixit