शमार जोसेफ, हंटर यांना आयसीसीचा मासिक पुरस्कार

वृत्तसंस्था/ दुबई आयसीसीतर्फे क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत प्रत्येक महिनाअखेर सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड केली जाते. दरम्यान विंडीजचा शमार जोसेफ तसेच आयर्लंडची आक्रमक फलंदाज अॅमी हंटर यांची जानेवारी महिन्यातील अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीचा हा पुरस्कार मिळवणारा अलिकडच्या कालावधीतील शेमल जोसेफ हा पहिलाच विंडीजचा क्रिकेटपटू ठरला आहे. […]

शमार जोसेफ, हंटर यांना आयसीसीचा मासिक पुरस्कार

वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे क्रिकेटपटूंच्या कामगिरीचा आढावा घेत प्रत्येक महिनाअखेर सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड केली जाते. दरम्यान विंडीजचा शमार जोसेफ तसेच आयर्लंडची आक्रमक फलंदाज अॅमी हंटर यांची जानेवारी महिन्यातील अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
आयसीसीचा हा पुरस्कार मिळवणारा अलिकडच्या कालावधीतील शेमल जोसेफ हा पहिलाच विंडीजचा क्रिकेटपटू ठरला आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत शेमर जोसेफची कामगिरी दर्जेदार झाली होती. 24 वर्षीय जोसेफने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्दापणातील पहिल्याच सामन्यातील पहिल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्रीन तसेच लाबूसेन यांचेही बळी मिळविले. ब्रिसबेनच्या दुसऱ्या कसोटीत शेमर जोसेफने 68 धावात 7 गडी बाद करुन आपल्या संघाला 8 धावांनी थरारक विजय मिळवून देत ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राखण्यात मोलाची कामगिरी केली होती. विंडीजचा ऑस्ट्रेलियावरील हा ऐतिहासिक कसोटी विजय ठरला.
महिलांच्या विभागात आयर्लंडची स्फोटक फलंदाज अॅमी हंटरने झिंबाब्वे विरुद्ध झालेल्या हरारे येथील टी-20 मालिकेत दर्जेदार कामगिरी केली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात 18 वर्षीय यष्टीरक्षक आणि फलंदाज अॅमी हंटरने 66 चेंडूत नाबाद 101 धावा झळकाविल्या होत्या. या कामगिरीमुळे आयर्लंडने हा सामना 57 धावांनी जिंकला होता. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हंटरने 77 धावा तर तिसऱ्या सामन्यात 42 धावा झळकाविल्या होत्या. या कामगिरीमुळे आयसीसीने जानेवारी महिन्यासाठी हंटरची सर्वोत्तम हिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. पुरूषांच्या विभागात या पुरस्कारासाठी विंडीजचा जोसेफ, इंग्लंडचा ऑली पॉप आणि ऑस्ट्रेलियाचा हॅझलवूड तसेच महिलांच्या विभागात अॅमी हंटर, ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिली आणि बेथ मुनी यांच्यात चुरस झाली.