दिल्लीत तिहेरी हत्याकांड; पतीने पत्नी आणि तीन मुलींचा गळा चिरून केली निर्घृण हत्या

दिल्लीतील चंदन पार्कमध्ये एका पतीने आपल्या पत्नी आणि तीन मुलींची निर्घृण हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील आउटर नॉर्थ भागात एक भयानक हत्याकांड उघडकीस आले आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. चंदन पार्कमध्ये एका वडिलांनी आपल्या तीन …

दिल्लीत तिहेरी हत्याकांड; पतीने पत्नी आणि तीन मुलींचा गळा चिरून केली निर्घृण हत्या

दिल्लीतील चंदन पार्कमध्ये एका पतीने आपल्या पत्नी आणि तीन मुलींची निर्घृण हत्या केली.  

 

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील आउटर नॉर्थ भागात एक भयानक हत्याकांड उघडकीस आले आहे, ज्यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. चंदन पार्कमध्ये एका वडिलांनी आपल्या तीन निष्पाप मुली आणि पत्नीचा गळा चिरून घटनास्थळावरून पळ काढला.

 

समयपूर बडली पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दिल्लीच्या आउटर नॉर्थ जिल्ह्यातील चंदन पार्क परिसरात बुधवारी सकाळी एक भयानक घटना घडली. सर्वोदय विद्यालयाजवळील एका घरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात घबराट पसरली.  

 

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली प्राथमिक तपासात असे दिसून आले की चौघांचाही धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता.  

ALSO READ: अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. व आरोपीला अटक करण्यासाठी अनेक विशेष पथके तयार केली आहे.  

ALSO READ: बँकॉकहून मुंबई विमानतळावर येणाऱ्या तीन प्रवाशांकडून २३ कोटी रुपयांचा गांजा जप्त

Edited By- Dhanashri Naik

Go to Source