डंपरच्या धडकेत पती पत्नी जागीच ठार : बोरपाडळे येथे सकाळी ११ वाजता घडला अपघात

वारणानगर : कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर बोरपाडळे ता.पन्हाळा येथील रोडवर सकाळी ११ वाजता हॉटेल सूरज आणि नाष्टा सेंटर समोर दुचाकी ॲक्टीव्हा गाडीला डंपरने जोरदार धडक दिल्याने इंचलकरजी येथील मारुती रामचंद्र महाजन वय ५७ व सुगंधा मारुती महाजन वय ५० रा. स्वामी मळा हे पती पत्नी जागीच ठार झाले. टाटा डंपर वरील चालकाचा ट्रक वरील ताबा […]

डंपरच्या धडकेत पती पत्नी जागीच ठार : बोरपाडळे येथे सकाळी ११ वाजता घडला अपघात

वारणानगर : कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर बोरपाडळे ता.पन्हाळा येथील रोडवर सकाळी ११ वाजता हॉटेल सूरज आणि नाष्टा सेंटर समोर दुचाकी ॲक्टीव्हा गाडीला डंपरने जोरदार धडक दिल्याने इंचलकरजी येथील मारुती रामचंद्र महाजन वय ५७ व सुगंधा मारुती महाजन वय ५० रा. स्वामी मळा हे पती पत्नी जागीच ठार झाले. टाटा डंपर वरील चालकाचा ट्रक वरील ताबा सुटून रोड च्या कडेला असलेल्या विद्युत पोलला प्रथम डंपरची धडक बसली त्या पाठोपाठ हॉटेल समोर नाष्टा करत थांबलेल्या पती पत्नी महाजन यांना धडक बसली यामध्ये ते जागीच ठार झाले. डंपरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची चर्चा अपघातस्थळी सुरु होती. वर नमुद पती पत्नीस धडक देऊन अपघात करून अपघातात जागीच मयत झालेले आहेत. अपघातस्थळी विस्कळीत झालेली वाहतूक महामार्ग पोलीस सुरळीत करत होते. कोडोली पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कोडोली उप जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्याचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी सांगितले.