हुरकेझ, व्होंड्रोसोव्हा यांची ऑलिंपिकमधून माघार

वृत्तसंस्था/पॅरिस 26 जुलैपासून होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतून झेकची 25 वर्षीय महिला टेनिसपटू मर्केटा व्होंड्रोसोव्हाने तसेच पुरूषांच्या विभागात पोलंडचा हुबर्ट हुरकेझने माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत खेळताना हुरकेझच्या गुडघ्याला दुखापत झाली  होती. ती दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने हुरकेझने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या विभागात झेकची 25 […]

हुरकेझ, व्होंड्रोसोव्हा यांची ऑलिंपिकमधून माघार

वृत्तसंस्था/पॅरिस
26 जुलैपासून होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतून झेकची 25 वर्षीय महिला टेनिसपटू मर्केटा व्होंड्रोसोव्हाने तसेच पुरूषांच्या विभागात पोलंडचा हुबर्ट हुरकेझने माघार घेतली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत खेळताना हुरकेझच्या गुडघ्याला दुखापत झाली  होती. ती दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने हुरकेझने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या विभागात झेकची 25 वर्षीय व्होंड्रोसोव्हाने दुखापतीच्या समस्येमुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये न खेळण्याचा  निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी व्होंड्रोसोव्हाने विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती पण यावर्षी तिला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही दुखापत पूर्णपणे बरी झाल्यानंतर आपण ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज होणार असल्याचे सांगितले. डब्ल्युटीए मानांकन यादीत व्होंड्रोसोव्हा सध्या 18 व्या स्थानावर आहे. तर तिला पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत मानांकनात बारावे स्थान देण्यात आले होते. पॅरिस ऑलिंपिकचा टेनिसचा ड्रॉ येत्या गुरूवारी काढण्यात येणार आहे. तर टेनिस या क्रीडा प्रकाराला येत्या शनिवारपासून प्रारंभ होणार आहे.