वेंगुर्ल्यातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
सावंतवाडी । प्रतिनिधी
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार, भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ल्यात झंझावाती दौरा केला. यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी ,सागरतीर्थ ग्रामपंचायत उपसरपंच सुषमा गोडकर यांनी कॉंग्रेस पक्षातून भाजप मध्ये प्रवेश केला. तर भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सागर राणे, संकेत धुरी व सोमेश बागकर यांच्या प्रयत्नातून वरची केरवाडा यंग बॉईज ग्रुप च्या सत्यनारायण मोणकर सहित ३० युवकांनी, सागरतीर्थ बागकरवाडी येथील रुपेश बागकर, गौरव बागकर, प्रशांत बागकर यांच्या सहित २५ युवकांनी, सागरतीर्थ वेळाकर येथील मोतेश फर्नांडीस, बनारत फर्नांडिस, रॉकी फर्नांडिस, विकी मेंडीस यांच्यासाहित २५ ते ३० युवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
तसेच जय मानसिश्वर वेंगुर्लाचे सॅमसन फर्नांडिस, ओंकार रेडकर यांच्यासाहित २० जणांनी, म्हाडा कॉलनी येथील सुहास परब, हर्ष कोचरेकर, अक्षय परब, गणेश जगताप, सदाशिव केरकर, मयूर पवार, केवल केरकर, सागर वेंगुर्लेकर, सुरज पालव, नयन गावडे, गुरुदास केरकर, यतीश पेडणेकर, जयेश राऊळ, तन्मय सातरडेकर, गिरीष जगताप आणि अक्षय मिसाळ यांच्यासाहित २० जणांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
यावेळी या सर्व युवकांचे विशाल परब यांनी भाजप मध्ये स्वागत करून पुढे त्यांच्या भागात दौरा आयोजित करून अधिक संघटना बळकट करण्यासाठी आश्वासन दिले. यावेळी ऍड निरवडेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, मनवेल फर्नांडिस, विजय रेडकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, प्रीतम सावंत, प्रसाद पाटकर, पुंडलिक हळदणकर, हेमंत गावडे, हितेश धुरी, भूषण आंगचेकर, राहुल गावडे, सागर राणे, मनोहर तांडेल, नारायण कुंभार, प्रसाद नाईक, अमेय धुरी, रवींद्र धोंड, सोमकांत सावंत, संतोष सावंत, प्रशांत बोवलेकर, बंटी गावडे, गौरेश खानोलकर, जया राऊळ, भुवनेश परब, कौस्तुभ वायंगणकर, अक्षय परब आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी वेंगुर्ल्यातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
वेंगुर्ल्यातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
सावंतवाडी । प्रतिनिधी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार, भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ल्यात झंझावाती दौरा केला. यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप युवा नेते विशाल […]