दुबई टेनिस स्पर्धेत हंबर्ट विजेता
वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे झालेल्या दुबई ड्युटी फ्री पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या 25 वर्षीय युगो हंबर्टने एकेरीचे जेतेपद पटकाविताना कझाकस्तानच्या बुबलिकचा पराभव केला.
2024 च्या टेनिस हंगामातील हंबर्टचे हे दुसरे जेतेपद आहे. यापूर्वी त्याने मार्सेली टेनिस स्पर्धा जिंकली होती. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात हंबर्टने बुबलिकचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. एटीपी टूरवरील अलिकडच्या कालावधित 2024 च्या टेनिस हंगामात झालेल्या पहिल्या सहा स्पर्धांमध्ये हंबर्टने अंतिम फेरी गाठली असून त्याने लॅटव्हीयाच्या गुलबीस आणि स्लोव्हाकीयाच्या क्लिझेनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
Home महत्वाची बातमी दुबई टेनिस स्पर्धेत हंबर्ट विजेता
दुबई टेनिस स्पर्धेत हंबर्ट विजेता
वृत्तसंस्था/ दुबई एटीपी टूरवरील येथे झालेल्या दुबई ड्युटी फ्री पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या 25 वर्षीय युगो हंबर्टने एकेरीचे जेतेपद पटकाविताना कझाकस्तानच्या बुबलिकचा पराभव केला. 2024 च्या टेनिस हंगामातील हंबर्टचे हे दुसरे जेतेपद आहे. यापूर्वी त्याने मार्सेली टेनिस स्पर्धा जिंकली होती. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात हंबर्टने बुबलिकचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. एटीपी […]