हुमा कुरैशी निर्मितीच्या क्षेत्रात
अभिनेत्री हुमा कुरैशी अभिनयासोबत चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात सक्रीय झाली आहे. ‘डबल एक्सएल’ या चित्रपटाद्वारे तिने निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात बॉडी शेमिंगचा मुद्दा तिने मांडला होता. आता हुमाचा निर्माती म्हणून दुसरा चित्रपटही पूर्ण झाला आहे. नचिकेत सामंतच्या दिग्दर्शनात तयार चित्रपट ‘बेबी डू डाय डू’ हा मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित क्राइम कॉमेडी धाटणीचा आहे. हुमा आणि तिचा भाऊ साकिब सलीमच्या प्रॉडक्शन हाउसच्या बॅनर अंतर्गत हा दुसरा चित्रपट असणार आहे. हुमा कुरैशी आणि साकिबने अभिनयाच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यावर स्वत:चे नवे प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे. एलेमेन 3 एंटरटेन्मेंट असे नाव या प्रॉडक्शन हाउसला देण्यात आले आहे. चित्रपटात हुमासोबत चंकी पांडे आणि सिकंदर खेर प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच यात काही मराठी कलाकारही दिसून येणार आहेत. हुमा कुरैशी अलिकडेच ‘महारानी 3’ या वेबसीरिजमध्ये दिसून आली होती. यातील हुमाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती लाभली आहे.
Home महत्वाची बातमी हुमा कुरैशी निर्मितीच्या क्षेत्रात
हुमा कुरैशी निर्मितीच्या क्षेत्रात
अभिनेत्री हुमा कुरैशी अभिनयासोबत चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात सक्रीय झाली आहे. ‘डबल एक्सएल’ या चित्रपटाद्वारे तिने निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात बॉडी शेमिंगचा मुद्दा तिने मांडला होता. आता हुमाचा निर्माती म्हणून दुसरा चित्रपटही पूर्ण झाला आहे. नचिकेत सामंतच्या दिग्दर्शनात तयार चित्रपट ‘बेबी डू डाय डू’ हा मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित क्राइम कॉमेडी धाटणीचा आहे. हुमा आणि […]