पाल पळवण्यासाठी फक्त एक घरगुती उपाय

तुम्ही सर्वांनी मोर पाहिला असेल. शिवाय त्याचे सुंदर पंख तुम्हाला मोहित करतात. या सुंदर दिसणाऱ्या मोराच्या पंखाने तुम्ही तुमच्या घरातून पाल गायब करू शकता. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, जर तुम्ही मोराची पिसे आणली आणि ती तुमच्या घरात लावली तर तुम्हाला …

पाल पळवण्यासाठी फक्त एक घरगुती उपाय

तुमच्या घराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पाल नक्कीच असेल. पाल सहजरीत्या बेडरुम, किचन किंवा कपाटांमध्ये प्रवेश करते. पाल पळवण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी त्यापासून सुटका होताना दिसत नाही. काही लोक पालीला खूप घाबरतात, तर काहींना तिला पाहून किळसही वाटते. अशात पाली घराबाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा एखादी पाल खोलीत किंवा बाथरूममध्ये येते तेव्हा आपण झाडू, काठी इत्यादीच्या साहाय्याने तिला बाहेर काढू लागतो, पण बाहेर गेल्यावर ती पुन्हा घरात येते. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी विविध मार्गांचा विचार करत राहतो.

 

जर तुम्हीही सर्व उपाय करून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला यापासून मुक्ती मिळवण्याची अशीच एक युक्ती सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुमच्या घरातील सर्व पाली पळवून लावू शकता. आज आम्ही तुम्हाला पक्ष्याच्या पिसाच्या साहाय्याने पाल कशी घालवावी ते सांगणार आहोत. ही युक्ती तुम्हीही एकदा नक्की करुन पाहू शकता.

 

पाल मोराच्या पिसापासून पळून जाते

तुम्ही सर्वांनी मोर पाहिला असेल. शिवाय त्याचे सुंदर पंख तुम्हाला मोहित करतात. या सुंदर दिसणाऱ्या मोराच्या पंखाने तुम्ही तुमच्या घरातून पाल गायब करू शकता. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, जर तुम्ही मोराची पिसे आणली आणि ती तुमच्या घरात लावली तर तुम्हाला त्या ठिकाणी पाल दिसणार नाहीत. यासाठी तुम्हाला फक्त बाजारातून अनेक मोराची पिसे खरेदी करायची आहेत. आता त्यांना घराच्या त्या खोल्यांमध्ये ठेवा जिथे पाली सर्वात जास्त दिसतात.

ALSO READ: मोरपीस घरात ठेवल्याने येते भरभराटी, फक्त 3 मोरपीस आणि आपल्याला फरक जाणवेल

मोराची पिसे कशी लावायची

जर तुमच्या खोलीत मोराची पिसे ठेवण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही टेपच्या साहाय्याने त्यांना भिंतीवर चिकटवू शकता. याशिवाय तुम्ही खिडक्या आणि दारांमध्ये मोराची पिसे अडकवू शकता. काही वेळा या ठिकाणांहूनही पाली घरात घुसतात. जिथे पाल येते तेथील दरवाजा नेहमी बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.

ALSO READ: Home Remedies घरातील डास दूर करण्यासाठी Refill Bottle याने भरा

पाल मोराच्या पिसापासून का पळते?

आता प्रश्न येतो की पाल मोराच्या पिसापासून का पळू लागते, तर जाणून घ्या की या पिसाला नैसर्गिक वास असतो. असे म्हटले जाते की हे मोराचे पंख पाहून पालीला भक्षक पक्ष्याची भीती वाटते. यासोबतच मोराच्या पिसांचे रंग अतिशय तेजस्वी आणि गडद असतात आणि पाल चमकदार गोष्टींपासून दूर पळते.