नैसर्गिकरित्या गुबगुबीत गाल मिळविण्याचे नैसर्गिक उपाय

दूधाने मसाज करा- दुधात असणारे फॅट आणि प्रथिने त्वचेला पोषण देतात. दररोज सकाळी आणि रात्री गालांवर कोमट दुधाने हलक्या हाताने ५-७ मिनिटे मसाज करा. नंतर साध्या पाण्याने धुवा.

नैसर्गिकरित्या गुबगुबीत गाल मिळविण्याचे नैसर्गिक उपाय

गाल भरदार करण्याचे नैसर्गिक उपाय

सुंदर, गोल व तजेलदार गाल चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवतात. जर तुमचे गाल थोडे पोकळ किंवा सुकलेले वाटत असतील, तर खालील घरगुती आणि नैसर्गिक उपाय नियमित करून तुम्ही नैसर्गिकरीत्या चबी चीक मिळवू शकता.

 

1. दूधाने मसाज करा- दुधात असणारे फॅट आणि प्रथिने त्वचेला पोषण देतात. दररोज सकाळी आणि रात्री गालांवर कोमट दुधाने हलक्या हाताने ५-७ मिनिटे मसाज करा. नंतर साध्या पाण्याने धुवा.

 

2. अ‍ॅलोवेरा जेल वापरा- अ‍ॅलोवेरा त्वचेला टवटवीत आणि टाईट बनवते. अ‍ॅलोवेरा जेल गालांवर हलक्या हाताने वरच्या दिशेने मसाज करा आणि १५ मिनिटांनी धुवा.

 

3. आहारात हेल्दी फॅट जोडा- गाल नैसर्गिकरीत्या भरदार दिसण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात हेल्दी फॅट आवश्यक आहे. अवोकॅडो, ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू, अक्रोड), शेंगदाणे नारळ व तूप याचे सेवन करा.

 

4. भरपूर पाणी प्या- पाणी त्वचेला हायड्रेट ठेवते व चेहरा टवटवीत दिसतो. दररोज ८-१० ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

 

5. फेस योगा करा- फेस योगा चेहऱ्याच्या स्नायूंना टोन करतो आणि रक्ताभिसरण वाढवतो.

काही उपयुक्त आसने:

ब्लोईंग बलून एक्सरसाइज – फुगा फुगवण्यासारखे तोंडात हवा भरा आणि १० सेकंद ठेवा.

चीक लिफ्ट – स्मित करताना गाल वर उचलून ५ सेकंद थांबा, १० वेळा करा.

दररोज एक मिनिट तुमचे गाल फुगवा. दिवसातून तीन वेळा असे करा.

दररोज २ ते ३ मिनिटे स्वतःला चिमटे काढा. यामुळे तुमचे बुडलेले गाल वर येण्यास मदत होईल.

फिश एक्‍सरसाइजमुळे गालांचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. हा व्यायाम करणे खूप सोपे आहे आणि तो कुठेही, कधीही, बसून करता येतो.

 

6. मेथीची पेस्ट बनवा आणि ती तुमच्या चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमचा लटकलेला चेहरा घट्ट होण्यास देखील मदत होईल.

 

7. सफरचंदाचा मास्क लावा- सफरचंदातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात. सफरचंदाचा लगदा गालांवर १५ मिनिटांसाठी लावा आणि नंतर धुवा.

 

अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.