सोनतळी परिसरातील घरफोडीचे सत्र सुरूच…पुन्हा 3 घरे फोडली…करवीर पोलीस ऍक्शन मुडवर

प्रयाग चिखली वार्ताहर करवीर तालुक्यातील सोनतळी परिसरात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले कुलूप बंद घरफोडीचे सत्र अजूनही कायम आहे सोमवारी रात्री पुन्हा एकदा सोनतळी येथील तीन घरे चोरट्यानी फोडली. आज येथील भारत कळके, प्रदीप पाटील, तसेच रूपाली चौगले, यांच्या घराचे कुलूप- कोयंडे तोडून घरामध्ये चोरीचा प्रयत्न केला त्यापैकी पाटील व चौगले यांच्या घरी चोरट्यांना काही […]

सोनतळी परिसरातील घरफोडीचे सत्र सुरूच…पुन्हा 3 घरे फोडली…करवीर पोलीस ऍक्शन मुडवर

प्रयाग चिखली वार्ताहर
करवीर तालुक्यातील सोनतळी परिसरात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले कुलूप बंद घरफोडीचे सत्र अजूनही कायम आहे सोमवारी रात्री पुन्हा एकदा सोनतळी येथील तीन घरे चोरट्यानी फोडली. आज येथील भारत कळके, प्रदीप पाटील, तसेच रूपाली चौगले, यांच्या घराचे कुलूप- कोयंडे तोडून घरामध्ये चोरीचा प्रयत्न केला त्यापैकी पाटील व चौगले यांच्या घरी चोरट्यांना काही मिळाले नसले तरी कळके यांच्या घरामध्ये भाड्याने राहावयास असलेले मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या घरातील एका लॅपटॉप सह सुमारे तीन लाखावर रुपयाचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. शेंडगे हे एका नातलगाकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवसासाठी बाहेर गावी गेले होते आजच्या घटनेमुळे चोरट्यांनी बंद घरकुले फोडण्याचे सत्र पुढे कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे . आत्तापर्यंत वेगवेगळ्या दिवसात दहा घरे फोडली आहेत दरम्यान या घटनेने करवीर पोलीस सतर्क झाले असून पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे यांनी दिवसभरात घटनास्थळी तपास यंत्रणा गतिमान करण्याबरोबरच लोकांना तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला सीसीटीव्ही बसवण्याची सूचना करून येथील महिला नागरिकांची बैठक घेऊन प्रबोधनही केले. दरम्यान चोरांचा सुगावा लागावा या दृष्टीने श्वान पथक तसेच चोरांच्या हाताचे ठसे शोधण्याची यंत्रणा राबवण्यात आली.
सोनतळी परिसरात गेल्या एक महिन्यात कुलूप बंद घरे फोडण्याचे सत्र चालू आहे. तीन वेगवेगळ्या दिवशी घडलेल्या घटनेत आतापर्यंत सुमारे दहा घरे चोरट्यानी फोडली आहेत ही सर्व घरे कुलूप बंद होती. बंद घरे फोडणे दरवाजा कुलूप कोयंडा तोडणे तिजोरीचे-कपाटाचे लॉक तोडून साहित्य, कपडे विस्कटून पाहणे -फेकणे तिजोरीतील फक्त सोन्यासारख्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणे लॅपटॉप सारख्या वस्तू चोरणे, किचन मधील डबे तपासणे, अशा प्रकारे सर्वच घरामध्ये झालेल्या चोरीच्या पद्धतीमध्ये समानता दिसून येते.
या घटनेमुळे करवीर पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत करवीर चे निरीक्षक श्री काळे यांनी तपासाच्या दृष्टीने तातडीने घटनास्थळी यंत्रणा गतिमान केली चोरीच्या घटनांना आळा बसावा या दृष्टीने ठिकठिकाणी नागरिकांच्या विशेषता महिलांच्या बैठका घेतल्या आणि चोरीच्या घटने संदर्भात प्रबोधन केले.
यावेळी करवीचे कॉन्स्टेबल विजय तळसकर तसेच प्रकाश कांबळे पोलीस पाटील- अरूणा कुमार दळवी ग्रामपंचायत सदस्य दीपक कुरणे आबिद मुल्लानी यांनी तपासाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या बैठका घेणे संपूर्ण गावा त च्या सुरक्षेबाबतची माहिती गोळा करणे गस्त घालणे बाबत सूचना करणे बाबत विशेष परिश्रम घेतले.
गेल्या महिन्याभरात तीन वेगवेगळ्या दिवशी सुमारे दहा घरे तर त्यांनी फोडली सुरुवातीच्या काही चोऱ्या नोंद झाल्या तर काही नागरिकांनी मोठ्ठा ऐवज चोरीस गेला नसल्यामुळे तक्रारी देण्याचे टाळले आहे. त्यातील जास्तीत जास्त घरे कुलूप बंद होती. या सर्व चोऱ्यांमध्ये दोन लॅपटॉप तसेच सुमारे पाच लाखावर चा ऐवज लंपास केला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे तसेच रात्रीच्या काळात गस्त घालणे सीसीटीव्ही लावणे आणि लोकांचे प्रबोधन साधने असे उपाय करवीरचे पोलीस निरीक्षक श्री अरविंद काळे यांनी राबवण्याचे आदेश दिले आहेत