दिल्लीच्या प्रेमनगरमध्ये घराला आग, 4 ठार

नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी पहाटे प्रेमनगर भागातील एका घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली होती. घरातील इन्व्हर्टरने पेट घेतला होता, यानंतर ही आग पूर्ण घरात फैलावली होती अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

दिल्लीच्या प्रेमनगरमध्ये घराला आग, 4 ठार

नवी दिल्ली :
दिल्लीत मंगळवारी पहाटे प्रेमनगर भागातील एका घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली होती. घरातील इन्व्हर्टरने पेट घेतला होता, यानंतर ही आग पूर्ण घरात फैलावली होती अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.