चापगाव येथे घरांची पडझड
खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू आहे. शनिवारी चापगाव येथील रहिवासी मष्णू अर्जुन सुतार यांचे राहते घर पावसामुळे कोसळल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच चापगावमध्ये अन्य काही घरांची किरकोळ पडझड झाली आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी या पडझड झालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तहसीलदार कार्यालयाला पाठविला आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चापगाव येथील काही घरांची पडझड झाली आहे. यात मष्णू सुतार यांचे राहते घर पडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच परशराम जीवाई, निलव्वा अंगडी, नागो कुराडे यांच्या घरांचीही थोड्याप्रमाणात पडझड झालेली आहे. या सर्व पडझड झालेल्या घरांची पाहणी ग्राम पंचायत अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी करून याचा अहवाल तहसीलदार कार्यालयाला पाठविलेला आहे.
Home महत्वाची बातमी चापगाव येथे घरांची पडझड
चापगाव येथे घरांची पडझड
खानापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू आहे. शनिवारी चापगाव येथील रहिवासी मष्णू अर्जुन सुतार यांचे राहते घर पावसामुळे कोसळल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच चापगावमध्ये अन्य काही घरांची किरकोळ पडझड झाली आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी या पडझड झालेल्या घरांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तहसीलदार […]
