राशिभविष्य

मेष वैवाहिक जोडीदाराच्या मदतीमुळे बरीचशी कामे पूर्ण करू शकाल. एखादे काम सुरू केल्यानंतर त्यात खंड पडू देऊ नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असेल. कामासंबंधी एखादी बातमी कळेल. ज्याचा पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. पथ्य-पाणी व्यवस्थित ठेवले तर तब्येतीवर विशेष परिणाम होणर नाही. शालेय वस्तूचे दान द्या. वृषभ व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला असेल. कामांची गती वाढवावी […]

राशिभविष्य

मेष
वैवाहिक जोडीदाराच्या मदतीमुळे बरीचशी कामे पूर्ण करू शकाल. एखादे काम सुरू केल्यानंतर त्यात खंड पडू देऊ नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असेल. कामासंबंधी एखादी बातमी कळेल. ज्याचा पुढे जाऊन फायदा होऊ शकतो. पथ्य-पाणी व्यवस्थित ठेवले तर तब्येतीवर विशेष परिणाम होणर नाही.
शालेय वस्तूचे दान द्या.
वृषभ
व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला असेल. कामांची गती वाढवावी लागेल. याचबरोबर थोडा जास्त वेळ कामाच्या ठिकाणी द्यावा लागेल. पैशांची आवक वाढल्यामुळे समाधान प्राप्त होईल. तब्येतीच्या छोट्या-मोठ्या तक्रारी सोडल्या तर जास्त काळजी करण्याची गरज नाही. एखाद्या छोट्या समारंभात भाग घेऊ शकाल.
अंघोळीच्या पाण्यात एक चमचा दही घाला.
मिथुन
नोकरी करणाऱ्या लोकांना एकाच वेळी अनेक कामे लागल्याने त्रास होऊ शकतो. मागील काही दिवसांमध्ये तब्येतीचा त्रास झाला असेल तर तो कमी होईल. जास्त पैसे मिळतील म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करणे टाळावे. धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडण्याची शक्मयता आहे. प्रेमींसाठी उत्तम काळ आहे.
दीप दान करावे.
कर्क
या आठवड्यात तब्येतीविषयी काळजी वाटण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील व्यक्ती सोडून बाहेरची व्यक्ती कितीही जवळची असली तरी तिच्याबरोबर मनातील गोष्टी शेअर करू नका किंवा आपल्या भविष्यातील योजना उघड करू नका, पुढे जाऊन यामुळे नुकसान होऊ शकते. आर्थिक बाजू सर्वसामान्य असेल.
जांभळा हात ऊमाल जवळ ठेवावा.
सिंह.
घरी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. त्यांच्यावर खर्च करत असताना आपल्या खिशाकडे लक्ष असू द्या. नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त बाहेर गावी जाणे संभव आहे. वैवाहिक जीवनामध्ये चढ-उतार असेल. शक्मयतो गैरसमजाला थारा देऊ नका. गुंतवणूक करत असताना योग्य परतावा मिळेल, याची काळजी घ्यावी.
वडिलांना स्वत:च्या हाताने दूध द्यावे.
कन्या 
एखादी व्यक्ती तुमच्याकडे पैशांची मागणी करेल. पण ती व्यक्ती योग्य आहे की नाही, याचा निर्णय घेऊन मगच पैसे द्यावे. आरोग्याच्या दृष्टीने थोडा त्रासदायक आठवडा असेल. नवीन शत्रू तयार होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीमध्ये पूर्वी केलेल्या चुकीचा आता त्रास होऊ शकतो.
मजुरांना दूध दान द्यावे.
तूळ
काही व्यक्ती प्रलोभने दाखवू शकतात. नोकरदार वर्गाला कामाचा बोजा वाढल्याने त्रास होऊ शकतो. एखाद्या जाणकार आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्याने नुकसान टळू शकते. तब्येत बिघडल्यास त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. काम करत असताना आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
भीमसेनी कापूर जवळ ठेवावा.
वृश्चिक
जुन्या नात्यांमध्ये काहीसा तेढ जाणवेल. नोकरीच्या शोधात असाल किंवा नवीन व्यापार सुरू करण्याच्या विचारात असाल तर त्यांना उत्तम संधी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर चांगली बातमी कळेल. घरात एखादा धार्मिक समारंभ साजरा कराल.
मातीच्या भांड्यात मध घालून घरी ठेवा.
धनू
कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. नोकरदारवर्गाला अधिकार प्राप्ती होऊ शकते  पण यामुळे गर्व येऊ देऊ नका किंवा अधिकाराचा गैरवापर करू नका. नवीन प्रॉपर्टी  घेण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे नीट तपासून घ्या. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. हवामान बदलाचा परिणाम होईल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असेल.
अन्न दान करा.
मकर
आर्थिक बाजू सर्वसाधारण असली तरी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. जी कामे अडली असतील त्यांना पूर्ण करण्याकरता जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांपैकी एखादी व्यक्ती अडचणीच्या वेळेला मदत करेल. स्वत:च्या तब्येतीबरोबरच कुटुंबीयांच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यावी लागेल.
गरजूला वस्त्र दान करा.
कुंभ
ऑफिसमधले वातावरण तणावाचे असेल. कामांना पूर्ण करण्याकरता सगळ्या प्रकारचा प्रयत्न करावा लागेल. यात शारीरिक आणि मानसिक थकवा येण्याची शक्मयता आहे. सहज बोलण्यात एखाद्या व्यक्तीशी वादावादी होऊन शत्रुत्व येण्याची शक्मयता आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल महत्वाची बातमी कळू शकेल.
हीना अत्तर वापरावे.
मीन
इतरांशी असलेले आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. एखाद्या समारंभामध्ये किंवा सामाजिक कामात भाग घेण्याची संधी मिळेल. योग्य निर्णय घेतल्यामुळे आणि आपल्या कामामुळे कुटुंबीयांच्या आणि कामाच्या ठिकाणी आणि वरिष्ठांच्या कौतुकाला पात्र व्हाल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे महागात पडू शकते.
पाच नाणी दान द्यावी.
टॅरो उपाय:   रोग,  शत्रू , आपल्यावर जळणारे  अशांनी  जर तुम्ही त्रस्त असाल  तर रात्री झोपताना एक नाणे आपल्या उशीखाली ठेवावे आणि दुसरे दिवशी सकाळी  जवळच्या स्मशानाच्या कंपाउंडमध्ये टाकावे.