राशिभविष्य
उपायच उपाय. . तोडगेच तोडगे
(भाग-6)
मागील चार भागांना वाचून किती जणांनी अशी विचारणा केली की आम्ही खास करून कुठल्या देवतेची किंवा कशा प्रकारची उपासना करावी ज्याने आम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. राशीप्रमाणे देवतांची उपासना करणे हे बहुतांशी लोकांना माहीत असते पण नक्षत्राप्रमाणे कुठल्या देवतेची उपासना करावी किंवा काय तोडगा करावा याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही. या लेखांमध्ये या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. इथे तुमचे जन्मनक्षत्र तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जन्म नक्षत्र जर माहीत नसेल तर तुमच्या कुंडलीमध्ये पहिल्या पानावर ‘चंद्र नक्षत्र’ असे जिथे लिहिलेले आहे ते तुमचे जन्म नक्षत्र. याही पलीकडे जाऊन जर एखाद्याची कुंडलीच नसेल तर एखाद्या जाणकार माणसाला विचारून आपले जन्म नक्षत्र नक्की करावे आणि मगच पुढचे उपाय करावे.
अश्विनी- श्री गणेशाची उपासना करावी. ॐ गं गणपतये नम: मंत्राचा जप कमीत कमी तीन माळा करावा. पिंपळाच्या मुळीला पांढरा चंदनाबरोबर एखाद्या ताईतात घालून जवळ ठेवावे. 2. भरणी-दुर्गेच्या उग्र रूपाची उपासना करावी किंवा यम देवतेची उपासना करावी. (माहिती करता सांगतो की, दक्षिणेमध्ये यमराजाचे मंदिरसुद्धा आहे). अगस्त झाडाच्या मुळीला तीन वेढे घालून जवळ ठेवावी. 3. कृतिका- भगवान कार्तिकेय आणि हनुमानाची उपासना करावी. कापसाच्या मुळीला दंडावर बांधावे. 4. रोहिणी- गाईची सेवा करावी. आपामार्ग झाडाच्या मुळीला ताईतात घालून धारण करावे. 5. मृग-दुर्गा पूजन करावे. जयंती नामाच्या गवताचे मूळ धारण करावे. 6-आर्द्रा-शिवशंकराची उपासना करावी. पिंपळाच्या मुळीला चौकोनी ताईतामध्ये धारण करावे. 7- पुनर्वसू पांढऱ्या आकड्याची मुळी रविवारी कृष्ण पक्षात ताईतामध्ये धारण करावी. 8-पुष्य- कोणत्याही गुऊंची जसे की स्वामी समर्थ, साईबाबा, शंकर महाराज, राघवेंद्र स्वामी इत्यादी गुऊंची सेवा करावी किंवा विष्णुसहस्रनामाचे पाठ करावे. कुशा नावाच्या गवताची मुळी धारण करावी. 9.आश्लेषा: शंकराची पूजा करावी ऊद्राभिषेक करावा, नागपंचमीला नागाचे पूजन करावे. 10. मघा-दर अमावास्येला पितरांच्या निमित्ताने दान करावे. भृंगराज झाडाच्या मुळीला धारण करावे. 11. पूर्वा फाल्गुनी-महालक्ष्मीचे पूजन करावे. कपटकारी नावाच्या झाडाच्या मुळीला धारण करावे. 12-उत्तरा फाल्गुनी आर्यमा देव हा पितरांचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्या निमित्ताने दान करावे. गायत्री मंत्राचा पाठ करावा. श्वेतार्क झाडाच्या मुळीला धारण करावे. 13- हस्त लक्ष्मी-व्यंकटेशाची, किंवा लक्ष्मीनारायणाची उपासना करावी. सूर्यनारायणाला अर्ध्य द्यावे. जायफळ झाडाच्या मुळीला धारण करावे.
मेष
आपला हा आठवडा चांगला जाणार असे दिसते. कोणते तरी वाहन अथवा वास्तू खरेदीचा विचार कराल. अथवा खरेदी कराल. भूमिगत द्रव्य मिळण्याची शक्मयता दिसते. विद्यार्थी असाल तर घेत असलेली विद्या चांगल्या मार्काने आत्मसात कराल. आत्मोन्नती साधाल.
उपाय:गुरुची उपासना करा.
वृषभ
परीक्षेचे दिवस आहेत. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. ती प्रामाणिकपणे अभ्यास करतीलच पण आपल्या मार्गदर्शनाची अथवा भावनिक पाठिंब्याची सुद्धा आवश्यकता असते. त्यांचे टेन्शन समजून घ्या आणि सपोर्ट करा. तुम्हीही एखाद्या कलेकडे वळाल. तुमच्या त्या सुप्त इच्छेला मार्ग द्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
उपाय: इष्टदेवतेची आराधना करा.
मिथुन
हा आठवडा तुम्हाला सावधान रहायला सांगतो आहे. नोकराचाकरांवर फार विश्वास ठेवू नका. नुकसान होण्याची शक्मयता आहे. काहीतरी शरीर पीडा संभवते. आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा. खाण्यापिण्यावर बंधन असू दे. तब्येतीला सांभाळून रहा. परीक्षेचे दिवस आहेत. विद्यार्थी वर्गानी विशेष जपून रहावे.
उपाय: तुळशीची पूजा करा.
कर्क
जोडीदाराबरोबर छान वेळ घालवाल. काही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय असेल तर पार्टनर बरोबर सलोख्याचे संबंध राहतील. व्यापारात उत्कर्ष संभवतो. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला छान जाईल असे दिसते. तुमच्या काही मौल्यवान वस्तू गहाळ झाल्या असतील अथवा आपल्याच हातून कुठेतरी मिसप्लेस झाल्या असतील तर त्या मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय: लक्ष्मीची उपासना करा.
सिंह
तब्येतीला सांभाळून रहा. सासुरवाडीकडून काहीतरी फायदा होण्याची शक्मयता आहे. लॉटरी किंवा तत्सम प्रकारातून धनलाभ होण्याची शक्मयता आहे. काहीतरी मानसिक व्यथा सतावत राहील. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन चंचलच असते आणि मन चिंती ते वैरी न चिंती. त्यामुळे मन दुसरीकडे किंवा नामस्मरणात गुंतवण्याचा प्रयत्न करा.
उपाय: हनुमान चालीसाची पारायणे करा.
कन्या
दूरच्या तीर्थयात्रेची संधी मिळेल. भाग्योदयाची सुऊवात दिसते. परोपकार करावासा वाटला तर कशाची वाट पाहू नका. ताबडतोब योजना अमलात आणा. सत्संग घडेल. वडिलांकडून मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद मिळेल. वृद्ध मंडळींचे आशीर्वाद मिळतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष घालावे. यश नक्की मिळेल.
उपाय: नामस्मरण करा.
तूळ
हा आठवडा उत्तम जाणार असे दिसते. नोकरीत असाल तर उच्च पद मिळण्याची शक्मयता आहे. स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्यात प्रगतीची शक्मयता आहे. मानमरातब मिळेल. पण म्हणून हुरळून जाऊ नका. अशा काळात पुण्य गाठीशी बांधून घ्या. जेणेकरून याच पुण्याच्या सहाय्याने आता मिळत असलेल्या ऐश्वर्याचा, मानाचा बऱ्याच काळपर्यंत उपभोग घेऊ शकाल.
उपाय: महादेवाची आराधना करा.
वृश्चिक
वडीलभावंडांचे सुख, सहवास मिळेल. हा आठवडा भावंडासमवेत व मित्र मैत्रिणीसोबत आनंदात घालवाल. समाजात चांगले स्थान प्राप्त कराल. सगळीकडून लाभ मिळण्याची शक्मयता आहे. पण कोणताही व्यवहार करताना सांभाळून करा. चौकसपणे व विचारपूर्वक व्यवहार कराल तर लाभच लाभ मिळण्याची शक्मयता आहे.
उपाय: संकट मोचन हनुमान स्तोत्र वाचा.
धनु
खर्चाकडे लक्ष द्या. अर्थात खर्च चांगल्यासाठी होण्याची शक्मयता आहे. परदेश प्रवास घडण्याचीही शक्मयता आहे. पण सांभाळून रहा. आपल्याला आध्यात्मिक विद्येमध्ये रस असेल तर त्याचा अभ्यास करण्याचा विचार करा. शत्रू पीडा होण्याची शक्मयता आहे. मन चंचल होण्याची शक्मयता आहे. मन ताब्यात ठेवण्याचा शक्मयतो प्रयत्न करा.
उपाय: दत्ताची उपासना करा.
मकर
मनासारखे चंचल काही नाही. त्यामुळे त्यावर बंधन जऊरीचे असते. या आठवड्यात हे करणे जऊरीचे आहे. काहीवेळा कारण नसता एकदम राग येण्याची शक्मयता आहे. स्वत:वर कंट्रोल असुद्या. बाकी जोडीदाराबरोबर वेळ छान घालवा. लग्नाळू मुला-मुलींना आपला जोडीदार मिळण्याची शक्मयता आहे. प्रयत्न करण्यास हरकत नाही.
उपाय: बाहेर पडताना कपाळाच्या मध्यावर गंध लावा.
कुंभ
हा आठवडा आपण आपल्या कुटुंबीयासोबत आनंदात घालवाल. आपण आपल्या वाणीने दुसऱ्याचे मन जिंकून घ्याल. पण कोणताही व्यवहार करताना त्यातील नफा नुकसान पडताळून पहा आणि मगच व्यवहार करा. पूर्वार्जित काही संपत्ती मिळण्याची शक्मयता आहे. आपल्याला काही लिहायची आवड असल्यास आपली ही इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करा.
उपाय:गोमातेची पूजा करा.
मीन
धाकट्या भावंडाची भेट होईल. अथवा धाकट्या भावंडासोबत वेळ छान जाईल. नोकरीत असाल तर आपल्या कामावर वरिष्ठ खुश होतील. कुठल्या तरी समारंभात सहभागी होण्याची शक्मयता आहे. पंचपक्वान्नावर ताव माराल. कदाचित या निमित्ताने जवळचे प्रवास होतील. पण प्रवासात कुठले धाडस कऊ नका. शेजाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभेल.
उपाय: मुक्मया जीवांना खाऊ- पिऊ घाला.