देशात येत्या 10 वर्षात 75 हजार वैद्यकीय जागा वाढवणार-गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी गुजरातमध्ये पोहोचले आणि त्यांनी गांधीनगरमधील अडालज येथील जनसहायक ट्रस्टद्वारे संचालित हिरामणी हिरामणी आरोग्यधाम या रुग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केंद्र सरकार येत्या 10 वर्षात देशभरात 75000 वैद्यकीय जागा वाढवण्याचा विचार करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले की, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केंद्र सरकार येत्या 10 वर्षांत देशभरात 75,000 वैद्यकीय जागा वाढवण्याचा विचार करत आहे. गांधीनगर येथे जनसहाय्यक ट्रस्ट संचालित हिरामणी रुग्णालय ‘हिरमणी आरोग्यधाम’ चे उद्घाटन केल्यानंतर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले आहे.
तसेच ‘पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम स्वच्छता अभियान सुरू केले. त्यानंतर त्यांनी लोकांना आजारांपासून वाचवण्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी आणि प्रत्येक घरात शौचालये बांधण्यावर भर दिला. त्यानंतर त्यांनी योग लोकप्रिय केला आणि 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारासाठी आयुष्मान भारत योजना सुरू केली.
तसेच ‘प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये सुधारणा करण्यावर तसेच देशभरात नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यावर भर देण्यात आला होता. आम्ही पुढील 10 वर्षात आणखी 75 हजार वैद्यकीय जागा वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नागरिकांना कमी किमतीत औषधे मिळावीत यासाठी जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जात आहे. मोदी सरकारने 140 कोटी नागरिकांच्या फायद्यासाठी 37 विविध योजना सुरू केल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी केली आहे.
Edited By- Dhanashri Naik