ग्रामीण जनतेसाठी आता ‘गृहआरोग्य’ योजना
राज्य सरकारची सहावी गॅरन्टी योजना : मोफत औषधे मिळणार
बेळगाव : राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने पाच गॅरन्टी योजना राबवून जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. शक्ती, गृहज्योती, युवानिधी, गृहलक्ष्मी, अन्नभाग्य या पाच योजना सरकार राबवित आहे. गॅरन्टी योजनांमुळे राज्यातील गरीब व मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली असल्याचा दावा काँग्रेस सरकार करीत आहे. आता सहावी गॅरन्टी योजना सुरू करून ग्रामीण जनतेला आणखी दिलासा देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागातील 30 वर्षांवरील नागरिकांची तपासणी करून मोफत औषधे घरपोच करण्याची ही योजना आहे. रक्तदाब, मधुमेहाने पीडित असलेले पाच लाखांहून अधिक जण गृहआरोग्य योजनेंतर्गत मोफत औषधाचा लाभ घेत आहेत.
त्याचबरोबर हृदयविकार, मूत्रपिंड, स्ट्रोक यासारखे जीवघेणे आजार असणाऱ्या ऊग्णांनाही गृहआरोग्य योजना उपयोगी ठरेल, असा दावाही सरकारकडून केला जात आहे. सरकारने ही योजना सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर कोलार जिल्ह्यामध्ये राबविली. योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन ती राज्यभरातून राबविण्यात आली आहे. त्यानंतर यात काही बदल करण्यात आला आहे. रक्तदाब, मधुमेहबरोबरच कर्करोग, मानसिक विकार यांसह 14 विविध प्रकारच्या आजारांवर तपासणी करण्याचे जाहीर करून त्याची कार्यवाहीही सुरू केली आहे. राज्यात आतापर्यंत 19 लाख 49 हजार 730 जणांची तपासणी करण्यात आली आहे. रक्तदाबावर मोफत औषधे मिळविणारे रुग्ण 3 लाख 26 हजार 703 तर 18 लाख 83 हजार 616 मधुमेह रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. मधुमेहावर मोफत औषधे मिळविणारे रुग्ण 2 लाख 36 हजार 759 आहेत.
शहरांमध्येही गृहआरोग्य योजना सुरू करावी
शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा पुरेशा नसतात. ऊग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी सरकारने ग्रामीण जनतेसाठी गृहआरोग्य योजना सुरू केली असून ती योग्य आहे. मात्र, शहरांमध्येही वाड्या, वस्त्या, झोपडपट्ट्या असतात. येथील रुग्णांनाही सरकारने योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Home महत्वाची बातमी ग्रामीण जनतेसाठी आता ‘गृहआरोग्य’ योजना
ग्रामीण जनतेसाठी आता ‘गृहआरोग्य’ योजना
राज्य सरकारची सहावी गॅरन्टी योजना : मोफत औषधे मिळणार बेळगाव : राज्यात अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने पाच गॅरन्टी योजना राबवून जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. शक्ती, गृहज्योती, युवानिधी, गृहलक्ष्मी, अन्नभाग्य या पाच योजना सरकार राबवित आहे. गॅरन्टी योजनांमुळे राज्यातील गरीब व मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली असल्याचा दावा काँग्रेस सरकार करीत आहे. आता सहावी गॅरन्टी योजना सुरू करून ग्रामीण जनतेला आणखी दिलासा देण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू […]
