Holi 2025 : या देशांमध्ये अशा प्रकारे खेळली जाते होळी

Foreign Tourism : भारतात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. तसेच परदेशात हा सण रंगांनी नव्हे तर फळे, पाणी आणि इतर गोष्टींनी साजरा केला जातो. भारतात दरवर्षी होलिका दहन आणि होळीचा सण मोठ्या थाटामाटात …

Holi 2025 : या देशांमध्ये अशा प्रकारे खेळली जाते होळी

 

Foreign Tourism : भारतात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. तसेच परदेशात हा सण रंगांनी नव्हे तर फळे, पाणी आणि इतर गोष्टींनी साजरा केला जातो. भारतात दरवर्षी होलिका दहन आणि होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसेच परदेशातही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीच्या रंगांचा उत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये होळी आता केवळ भारतीय समुदायच नव्हे तर इतर संस्कृतीतील लोक देखील साजरी करतात.तर चला जाणून घेऊ या विविध देशात होळी सण कसा साजरा केला जातो.

ALSO READ: Holi 2025 विशेष मार्चमध्ये भेट देण्यासाठी तीन सर्वोत्तम ठिकाणे
इटली-
इटली या देशामध्ये होळीच्या निमित्ताने लोक एकमेकांवर संत्री फेकतात. व मोठ्या आनंदात उत्साहात हा सण साजरा करतात. इथे रंगांऐवजी संत्रीने होळी खेळली जाते.

नेपाळ-
नेपाळमधील वेगवेगळ्या ठिकाणी होळीच्या रीतिरिवाजांमध्ये थोडेफार फरक आहे. काठमांडूमध्ये होळीच्या एक आठवडा आधी बांबूचा खांब उभारला जातो ज्यावर वेगवेगळ्या रंगांचे कपडे टांगले जातात. होळीचा पहिला आठवडा मजेदार बनवण्यासाठी ही खास परंपरा पाळली जाते. तसेच स्थानिक लोकांसाठी ते एक सांस्कृतिक प्रतीक आहे. या काळात लोक आनंदाने आणि रंगांनी उत्सवाची तयारी करतात, ज्यामुळे उत्सवाचे वातावरण आणखी रंगीत आणि उत्साही बनते.
 
अमेरिका-
अमेरिकेतही मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला जातो. अमेरिकेत याला ‘रंगांचा उत्सव’ म्हणून ओळखले जाते. येथे लोक एकमेकांवर रंग फेकतात आणि नाचतात आणि गाणी गातात. व आनंद व्यक्त करतात.

ALSO READ: होळीच्या दिवशी मथुरेतील तीन ठिकाणी नक्की भेट द्या
न्यूझीलंड-
न्यूझीलंडमध्येही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या देशात होळीला वानका म्हणून ओळखले जाते. येथे मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण एकत्र येऊन रंग खेळून आनंद साजरा करतात. न्यूझीलंडमध्ये होळी ६ दिवस साजरी केली जाते.
 
ऑस्ट्रेलिया-
ऑस्ट्रेलियामध्येही होळी साजरी केली जाते. तसेच हा सण ऑस्ट्रेलियामध्ये दर दोन वर्षांनी एकदाच साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियामध्ये होळीला टरबूज म्हणून ओळखले जाते. रंगांऐवजी लोक एकमेकांवर टरबूज फेकतात. व सण साजरा करतात.
ALSO READ: भस्म होळी वाराणसी, जिथे रंगांऐवजी चितेच्या राखेने होळी खेळली जाते
कंबोडिया-
कंबोडियामध्ये होळी सण एका खास नावाने ओळखला जातो, ज्याला चोल चन्नम थेमे म्हणतात. यामध्ये लोक एकमेकांवर पाणी फेकून सण साजरा करतात. एकत्र नाचतात आणि गातात आनंद व्यक्त करतात.