हॉकी इंडियाच्या ड्रॅगफ्लिकर्स, गोलरक्षकांसाठी नव्या कार्यक्रमाची योजना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल नोंदविणे तसेच गोलरक्षण संदर्भात बऱ्याच त्रुटी निर्माण झाल्या असल्याने आता हॉकी इंडियाने या दोन समस्यांवर नव्या शोधमोहिमेचा कार्यक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे. हॉकी क्षेत्रामध्ये तळागळातील स्तरावरुन आता हॉकीपटूंची निवड करुन त्यांना या दोन क्षेत्रामध्ये खास प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. भारतीय पुरूष आणि महिला […]

हॉकी इंडियाच्या ड्रॅगफ्लिकर्स, गोलरक्षकांसाठी नव्या कार्यक्रमाची योजना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल नोंदविणे तसेच गोलरक्षण संदर्भात बऱ्याच त्रुटी निर्माण झाल्या असल्याने आता हॉकी इंडियाने या दोन समस्यांवर नव्या शोधमोहिमेचा कार्यक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे. हॉकी क्षेत्रामध्ये तळागळातील स्तरावरुन आता हॉकीपटूंची निवड करुन त्यांना या दोन क्षेत्रामध्ये खास प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे.
भारतीय पुरूष आणि महिला हॉकी क्षेत्रामध्ये आता या दोन समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हॉकी इंडियाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये गोलरक्षण तसेच पेनल्टी कॉर्नरवर अचूक गोल नोंदविणे (ड्रॅग फ्लिकिंग) यांची उणीव भासत असल्याने आता तळागळातील हॉकीपटूंची निवड करुन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची योजना लवकरच हाती घेतली जाणार आहे. हॉकी इंडियाच्या या बैठकीला भारताचे माजी गोलरक्षण अॅड्रीयन डिसोझा, भरत छेत्री, योगिता बाली, हेलन मेरी, दिपीका मुर्ती, आकाश चिकटे, पी. टी. राव त्याचप्रमाणे भारताचे माजी पेनल्टी कॉर्नर तज्ञ रुपींदरपाल सिंग, जुगराज सिंग, व्ही. आर. रघुनाथ, गुरजिंदर सिंग, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप र्तिकी, सरचिटणीस भोलानाथ सिंग, खजिनदार शेखर मनोहरन, एचपीडी संचालक हिमेन व्रुस उपस्थित होते.
आता ही नवी योजना अमलात आणण्यासाठी नवोदित हॉकीपटूंचा शोध घेऊन त्यांना माजी गोलरक्षक आणि पेनल्टी कॉर्नर तज्ञ हॉकीपटूंकडे मार्गदर्शनासाठी सोपविले जाईल. नव्या योजनेमध्ये तीन दिवसांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या नवोदित युवा हॉकीपटूंकरीता निवासाची सोय तसेच प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. भारतीय हॉकी क्षेत्राचा नजिकच्या भविष्य काळात दर्जा सुधारण्यासाठी ही योजना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास भारताचे माजी कर्णधार आणि गोलरक्षक छेत्री यांनी व्यक्त केला.