Sangli Crime : सांगलीत हिसडा टोळीचा पुन्हा एकदा धुमाकूळ
सांगलीत पुन्हा सक्रिय ‘हिसडा टोळी’;
सांगली – सांगलीत आणि विश्रामबागमधील उपनगरीय भागात पुन्हा एकदा हिसडा टोळीने डोके वर काढले आहे. या टोळीकडून सातत्याने वृध्द महिलांना टार्गेट केले जात आहे. पार्श्वनाथनगर येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची पाच तोळ्याची सोन्याचे चेन खेचून नेण्यात आली. त्यानंतर सांगली पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सांगली पोलीस ठाण्यानिहाय त्या त्या भागातील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांशी पोलीसांनी बैठका सुरू केल्या आहेत. त्या बैठकामध्ये त्यांनी विशेष सूचनाही दिल्या आहेत. पण तरीही या हिसडा टोळीचा दणका सुरूच आहे.
तीन महिन्यापासून शहरात हिसडा टोळीच्या कारवाया थांबल्या होत्या, पोलीसांच्या कडक कारवाईने टोळीतील अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जेरबंद केले होते. पण आता पुन्हा एकदा पंधरा दिवसापासून हिसडा टोळी
कार्यरत झाली असून त्यांनी आठवड्यात तीन ठिकाणी हिसडा मारून दागिने पळवून नेले. याशिवाय या सर्व चोऱ्या दिवसाढवळ्या होत चालल्या आहेत. त्यामुळे चिंतेची बाब बनली आहे. यातील एक प्रकार भयानक आहे. डिसडा टोळीचे कारनामे सीसीटीव्हीमध्ये येत चालले आहेत. पण तरीही या टोळीचा पत्ता मिळून येत नाही.
हिसडा टोळीत असणारे अनेक रेकॉ र्डवरील गुन्हेगार अटकेत आहेत. पण आता पुन्हा एकदा डिसडा टोळी कार्यरत झाल्याने पोलीसांकडून टोळीतील कोणते गुन्हेगार बाहेर आहेत. त्याची तपासणी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेजव्दारे कोणते रेकॉर्डवरील गुन्हेगार आढळून येतात का याचीही तपासणी करण्यात येत आहे. सध्या सणासुदीचे आणि लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने महिलांच्या अंगावर दागदागिने असतात. याचाच फायदा हे टोळीचे गुन्हेगार घेतात. ज्या भागात नागरिकांची वर्दळ कमी असते त्याच भागात हे गुन्हेगार लक्ष्य ठेवून असतात. हे आजपर्यंतच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पोलीसांची गरत मोठ्याप्रमाणात वाढविण्याची गरज आहे. पोलीसांची गस्त आणि चौकातील पोलीस टोळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात मोठ्याप्रमाणात गस्त वाढविण्याची गरज आहे. तसेच कोरोना काळात शहरात अनेक भागात तात्पुरत्या स्वरूपाच्या चौक्या उभ्या केल्या होत्या.
त्यामुळे त्या त्या परिसरात शांतता पोलीस ठाण्यानिहाय बैठका सुरू या हिसडा टोळीला रोखण्यासाठी आता प्रत्येक पोलीस ठाण्यानिहाय नागरिकांच्या बैठका घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामध्ये अशा चोरट्यांपासून कसा बचाव करायचा तसेच ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना कोणत्या नंबरवरून संपर्क साधायचा याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय मार्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांनी आपले दागदागिने दिसू नयेत याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याशिवाय कोणी अनोळखी व्यक्ती पत्ता विचारण्यासाठी जवळ येत असेल तर त्याच्यापासून तात्काळ थोडे अंतर दूर राहण्याचा सल्ला पोलीसांकडून देण्यात आला आहे. याशिवाय या आपल्या गल्लीत अज्ञात व्यक्ती आढळून येत असेल तर त्याबाबत तात्काळ पोलीस ठाण्याला त्याची माहिती द्यावी असे आवाहनही पोलीसांनी केले आहे.
पण आता या चौक्या काढल्यामुळे या हिसडा टोळीचे फावते आहे. आता पोलीसांनी ठराविक चौकात गस्त घालण्याची गरज आहे. तात्पुरत्या स्वरूपाच्या चौक्या पुन्हा उभ्या केल्याने टोळीला दणका बसू शकतो.
एसटी स्टँडवरील चोरी हा वेगळाच प्रकार मध्यवर्ती बसस्थानकातून महिलेचे दागिने पळविणाऱ्या चोरट्यांच्याबाबतही असाच प्रकार घडतो.
या बसस्थानाकात सीसीटीव्ही कमी आहेत. तसेच या बसस्थानकावर अनेक बस या बसस्थानकाच्या मुख्य ठिकाणापासून बाजूला लावण्यात येतात. त्यामुळे याठिकाणी चोरटे सहजपणे हातसफाई करतात. तसेच महिलांचे दुर्लक्षही चोरीला कारणीभूत ठरत चालले आहे. त्यामुळे या चोरीचे प्रकार रोखण्यासाठी पोलीसांनी याठिकाणी सतर्कता ठेवली आहे. तरीसुध्दा अशा घटना घडताहेतच.
Home महत्वाची बातमी Sangli Crime : सांगलीत हिसडा टोळीचा पुन्हा एकदा धुमाकूळ
Sangli Crime : सांगलीत हिसडा टोळीचा पुन्हा एकदा धुमाकूळ
सांगलीत पुन्हा सक्रिय ‘हिसडा टोळी’; सांगली – सांगलीत आणि विश्रामबागमधील उपनगरीय भागात पुन्हा एकदा हिसडा टोळीने डोके वर काढले आहे. या टोळीकडून सातत्याने वृध्द महिलांना टार्गेट केले जात आहे. पार्श्वनाथनगर येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेची पाच तोळ्याची सोन्याचे […]
