ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी

वाराणसीतील जिल्हा न्यायालयाने हिंदूंना ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने नामनिर्देशित केलेल्या पुजाऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या निकालाला आपण उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असल्याचे अंजुमन इंतेजामिया मसाजिद समितीने सांगितले आहे. मशिदीच्या सील केलेल्या भागामध्ये उत्खनन आणि सर्वेक्षण करण्याची विनंती करण्यासाठी […]

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी

वाराणसीतील जिल्हा न्यायालयाने हिंदूंना ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने नामनिर्देशित केलेल्या पुजाऱ्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या निकालाला आपण उच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असल्याचे अंजुमन इंतेजामिया मसाजिद समितीने सांगितले आहे. मशिदीच्या सील केलेल्या भागामध्ये उत्खनन आणि सर्वेक्षण करण्याची विनंती करण्यासाठी चार महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना जिल्हा न्यायालयाने आपला आदेश जारी केला आहे.
व्यासांचे तळघर असे नाव असलेल्या मशिदीचा काही भाग काही दिवसांपासून बंद ठेवला होता. आचार्य वेद व्यास पीठ मंदिराचे मुख्य पुजारी शैलेंद्र कुमार पाठक यांनी यासंबंधी खटला दाखल केला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने याची दखल घेत या भागाचा ताबा देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी तिथे पुजा अर्चा करणाऱ्या पुजाऱ्यांची योग्य ती व्यवस्था करावी असेही सांगितले आहे.
यावेळी बोलताना आचार्य वेद व्यास पीठ मंदिराचे मुख्य पुजारी शैलेंद्र कुमार पाठक म्हणाले, “आता हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले असून जिल्हा प्रशासन सात दिवसांमध्ये तिथे व्यवस्था उभी करणार आहे. त्यामुळे हिंदूंना तिथे पूजाअर्चा सुरू करण्यास कोणतीही हरकत असणार नाही. काशी विश्वनाथ ट्रस्टकडून हा पूजापाठ केली जाईल. वाराणसी जिल्हा न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असा आहे. याआधीच्य़ा सरकारांनी सत्तेचा दुरूपयोग करून हिंदू समाजाला पूजापाठ करण्यापासून रोखले होते. त्याला आज न्यायलयाने खोडून काढून हिंदूच्या बाजून निर्णय दिला आहे. यापुढे आता वजूखान्याचा सर्व्हे करणे हेच आमचे लक्ष्य असणार आहे” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.