हिमानी पुनियाचे सलग दुसरे विजेतेपद

जयपूर : पंचकुलातील झालेल्या योनेक्स-सनराईज 46 व्या इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 40 वर्षांवरील वयोगटात जयपूरच्या तृतीय मानांकित हिमानी पुनियाने एकेरीचे जेतेपद पटकाविले. तत्पुर्वी हिमानीने गेल्या वर्षी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. पंचकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेत तृतीय मानांकित हिमानी पुनियाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आदिती रोडेचा 21-19, 21-18 अशा सरळ […]

हिमानी पुनियाचे सलग दुसरे विजेतेपद

जयपूर : पंचकुलातील झालेल्या योनेक्स-सनराईज 46 व्या इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 40 वर्षांवरील वयोगटात जयपूरच्या तृतीय मानांकित हिमानी पुनियाने एकेरीचे जेतेपद पटकाविले. तत्पुर्वी हिमानीने गेल्या वर्षी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. पंचकुलामध्ये झालेल्या या स्पर्धेत तृतीय मानांकित हिमानी पुनियाने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या आदिती रोडेचा 21-19, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये 27 मिनिटात फडशा पाडत जेतेपद स्वत:कडे राखले. गोव्यामध्ये गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत हिमानीने छत्तीसगडच्या मनीषा सिंगचा 21-16, 21-17 असा पराभव करत पहिल्यांदा जेतेपद मिळविले होते.  महिलांच्या 40 वर्षांवरील वयोगटात दुहेरीच्या उपांत्dयापूर्व फेरीच्या लढतीत दीपा माथूर आणि आदिती रोडे यांनी हिमानी पुनिया व निलम पांडा यांचा 21-18, 22-20 असा पराभव केला होता.