हिमाचल काँग्रेस सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठविण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर विविध पातळीवर बदल करण्यात येत आहेत. या संदर्भात काही अपडेट समोर येत आहेत. यात काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी किंवा प्रियांका गांधी यांना हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकते. दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रे•ाr यांनी देखील सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर तेलंगणा राज्यातून जाण्यासंदर्भात भूमिका मांडली […]

हिमाचल काँग्रेस सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठविण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर विविध पातळीवर बदल करण्यात येत आहेत. या संदर्भात काही अपडेट समोर येत आहेत. यात काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी किंवा प्रियांका गांधी यांना हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकते. दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रे•ाr यांनी देखील सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर तेलंगणा राज्यातून जाण्यासंदर्भात भूमिका मांडली आहे. हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी आम्ही गांधी परिवारासोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. गांधी परिवाराकडून परवानगी मिळाल्यानंतर याबाबतची पुढील कार्यवाही करण्यता येणार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. या राज्यातून सोनिया गांधी किंवा प्रियांका गांधी पाठविले जाऊ शकते. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यापैकी एकजण राज्यसभेवर जाऊ शकतात, असे प्रतिभा सिंह या म्हणाल्या, की 2 एप्रिल रोजी राज्यसभेतून 56 खासदार निवृत्त होणार आहेत. त्यामध्ये हिमाचल प्रदेशातून एक खासदार निवृत्त होणार आहे. त्या जागेवर गांधी परिवारातील एका सदस्याला राज्यसभेवर पाठविण्याच्या तयारीत असल्याचे प्रतिभा सिंह यांनी स्पष्ट केले आहे.