बेळगावात उच्च दर्जाचे आरोग्य दालन

सेंट्राकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल : सर्व सुविधा-आपलेपण, वैयक्तिक काळजी हे वैशिष्ट्या बेळगाव : वैद्यकीय सेवा इतर सेवांपेक्षा वेगळी आहे. माणसांची सेवा केवळ ग्राहक न समजता करता आली पाहिजे. कारण तिला मानवतेचे परिमाण असते. माणसाचे सुरळीत जगणे आणि त्याच्या व्याधी यामध्ये ती उभी असते. तिच्यात जर करुणेने बघण्याचा दृष्टिकोन नसेल, नुसतेच पैसा कमावणे हा हेतू असेल तर […]

बेळगावात उच्च दर्जाचे आरोग्य दालन

सेंट्राकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल : सर्व सुविधा-आपलेपण, वैयक्तिक काळजी हे वैशिष्ट्या
बेळगाव : वैद्यकीय सेवा इतर सेवांपेक्षा वेगळी आहे. माणसांची सेवा केवळ ग्राहक न समजता करता आली पाहिजे. कारण तिला मानवतेचे परिमाण असते. माणसाचे सुरळीत जगणे आणि त्याच्या व्याधी यामध्ये ती उभी असते. तिच्यात जर करुणेने बघण्याचा दृष्टिकोन नसेल, नुसतेच पैसा कमावणे हा हेतू असेल तर तिच्यात आणि इतर लुबाडणाऱ्या सेवात काहीही फरक नाही. कोणताही माणूस मग तो कसाही का असेना, आपल्या डॉक्टरला कधीही विसरत नाही. त्याच्यापाशीच तो मनमोकळा व्यक्त होतो आणि जितका मोकळेपणाने व्यक्त होईल असे वातावरण असेल तर तितक्या त्वरेने व्याधीतून मुक्त होतो. झपाट्याने वाढणाऱ्या आणि कर्नाटकमधील महत्त्वाच्या बेळगाव शहरात एक नवी वैद्यकीय सुविधा उभी राहिली आहे. दक्षिण बेळगावात सेंट्राकेअर या नावाचे हे हॉस्पिटल एनडीजी सेवासदन या संस्थेच्या विद्यमाने कार्यरत झाले आहे. सगळ्या सुविधा आणि इतरत्र सहसा न आढळणारी आपलेपणाची आणि वैयक्तिक काळजी घेणारी व्यवस्था हे या रुग्णालयाचे वैशिष्ट्या मानता येईल.
उच्चविद्याविभूषित डॉक्टर
उपचार सर्वच करतात; पण आम्ही रुग्ण व्याधीमुक्त करतो. आमच्या रुग्णालयाची ही पंचसूत्री आहे, असे या रुग्णालयाच्या प्रमुख संचालिका डॉ. नीता देशपांडे सांगतात. आपल्याला ज्ञात आहेच की, डॉ. नीता देशपांडे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी, मातब्बर आणि ज्यांच्या कौशल्याचा बेळगाव परिसरात गेली तीन दशके बोलबाला आहे, अशा अत्यंत उच्चविद्याविभूषित डॉक्टर आहेत. कोविड काळात त्यांनी रुग्णांच्या सेवेचे केलेले काम अनमोल आहे. त्या अग्रगण्य मधुमेह तज्ञ तर आहेतच, पण अतिस्थूलता या रोगावरील प्रसिद्ध धन्वंतरी आहेत. मधुमेहावर जे जागतिक संशोधन चालते, त्यातही त्यांचा मोलाचा सहभाग असतो. देशात होणाऱ्या विविध वैद्यकीय परिषदा, संशोधन चर्चासत्रे यात त्या मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे रुग्णसेवेतील नवे काय? याचे संपूर्ण आकलन त्यांना आहे. ज्या डॉक्टरचे नुसता व्यवसाय नव्हे तर मूलभूत संशोधनाकडेही लक्ष असते, त्याच्या हाताला गुण येतोच.
आपल्या उद्यमशीलतेने ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचा चेहरामोहरा, आपल्या सेवासदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून बदलणारे डॉ. रविकांत पाटील या हॉस्पिटलचे संचालक आहेत. डॉ. रविकांत पाटील हे निष्णात हृदयरोग तज्ञ आणि शल्यविशारद असून पश्चिम महाराष्ट्रात आणि कर्नाटकात त्यांच्या वैद्यकीय सेवेतील नवनवीन उपक्रमांचे मोठे अप्रूप आहे. डॉ. रविकांत पाटील हे दुबई, व्हिएतनाम आदी ठिकाणी हृदय शल्यविशारद म्हणून परिचित आहेत. त्यांच्या सेवासदन हॉस्पिटल साखळीने अनेक रुग्णांच्या आयुष्यात आनंद आणि विश्वास जागविण्याचे मोठे काम केले आहे. वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक सेवेच्या जाणिवेतून डॉ. रविकांत पाटील यांच्या संस्थेने महिला सशक्तीकरण, आरोग्य, पर्यावरण अशा विविध कामांतून आतापर्यंत 10 लाख लोकांना लाभ दिला आहे. त्यांची विद्यार्थिनींसाठी असणारी सायकल पेढी शेकडो मुलींसाठी वरदान ठरली आहे. डॉ. रविकांत पाटील बेळगावातील या रुग्णालयाचे संचालक असणे बेळगावकरांना सुखावणारे ठरेल, यात शंका नाही.
खात्री देणारे एकमेव रुग्णालय
सेंट्राकेअर रुग्णालयाला डॉ. नीता देशपांडे यांचे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्यासोबत विविध विषयांतील वैद्यकीय तज्ञांची मोठी टीम आहे. यात बेळगावसारख्या शांत आणि संयमी परिसरात नव्याने दाखल झालेल्या सेंट्राकेअरमध्ये रुग्णांवर आवश्यक ते सर्व उपचार तर होतीलच, पण त्यांच्या मानसिक समाधानाचीही सर्वतोपरी काळजी घेतली जाईल. त्यांच्याशी आपुलकीने वागणारा स्टाफ आणि रोगाच्या मूलभूत कारणांकडे लक्ष देणारे तज्ञ डॉक्टर असतील. रुग्णाला आधार देणारे वातावरण आहे. त्याच्या रोगापासून त्याला मुक्ती देतानाच त्याला पुन्हा त्याच्या निरोगी आयुष्याकडे घेऊन जाणारे आवश्यक ते बळ आणि समाधानही मिळेल याची खात्री देणारे हे एकमेव रुग्णालय आहे हे निश्चित. आपण अवश्य या रुग्णालयाच्या वैशिष्ट्यापूर्ण सुविधांचा लाभ घ्यावा. तिथल्या ममतेने वागणाऱ्या स्टाफचा अनुभव घ्यावा, असे आवाहन डॉ. नीता देशपांडे यांनी केले आहे. आता बेळगावच्या नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी इतर शहरांकडे जावे लागू नये आणि सर्व आवश्यक उपचार किमान खर्चात मिळावेत हा उद्देश हे रुग्णालय सुरू करण्यामागे आहे. आपल्या गावातील आजारी माणसांना त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन पूर्ववत निरामय आयुष्याकडे घेऊन जाणे हेच या सेंट्राकेअरचे मिशन आहे.
रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध आहेत

सेंट्राकेअर मधुमेह, लठ्ठपणा आणि चयापचयआरोग्य संस्था
मधुमेही पाय आणि जखमेची काळजी
कार्डिओलॉजी (कॅथ लॅब आणिकार्डियाक सर्जरी)
सांधे बदलण्याची आणि मणक्याची शस्त्रक्रिया
फिजिओथेरपी आणि कार्डियाक पुनर्वसन
पोषण आणि आहारशास्त्र
कॉस्मेटोलॉजी आणि कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी
छातीचे रोग आणि पल्मोनोलॉजी
आपत्कालीन सेवा, आघात आणि क्रिटिकल केअर
मानसोपचार
बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया
न्युरोलॉजी आणि न्युरोसर्जरी
जनरल मेडिसिन
सामान्य शस्त्रक्रिया
नेफ्रोलॉजी आणि डायलिसिस
युरोलॉजी
संधिवातशास्त्र