उच्च न्यायालयाचा मराठा आंदोलकांना अल्टिमेटम
मुंबईतील (mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस. या आंदोलनाच्या विरोधातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात दुपारी बारा वाजता सुनावणी झाली. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या मराठा आंदोलनाला परवानगी नाही. त्यामुळे पुढील दोन तासात, अर्थात आज मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई सुरळीत करा, आंदोलकांना आदेशाचे पालन करायला सांगा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी लागेल. मनोज जरांगे पाटील यांना जबर दंड लावण्याचाही आदेश आम्हाला द्यावा लागेल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) दिला आहे. तसेच मुंबईकरांना शांतपणे त्यांचे जनजीवन जगू द्या, असंही कोर्ट म्हणाले.केवळ पाच हजार जणांना परवानगी असताना काय काळजी घेतली? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. आंदोलकांकडे परवानगी नाही, त्यामुळे दोन वाजून 40 मिनिटांपर्यंत तात्काळ जागा रिकामी करा, आम्हाला तीन वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत झालेलं हवं, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन आढावा घेऊ, असं कोर्टाने निक्षून सांगितलं.यापूर्वी पाचशे मोर्चे काढले, पण कधीही अशी परिस्थिती उद्भवली नाही, यापुढे कोणतेही आंदोलक बेशिस्तपणे वागणार नाहीत, याची हमी देऊ, असे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. स्वाती साठे यांच्या खंडपीठासमोर म्हणणे मांडले. खंडपीठाने दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी ठेवली.दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाच्या सूचनांची माहिती दिली. मात्र मनोज जरांगेंनी सूचना दिल्याशिवाय इथून इंचभरही न हलण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. याआधी, मुंबई पोलिसांनी (mumbai police) आंदोलकांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस सकाळीच बजावली होती. मात्र त्यानंतरही मनोज जरांगे किंवा मराठा आंदोलकांनी कुठलीही हालचाल केली नाही. आता कोर्टाने फटकारताच आंदोलक काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेहेही वाचामराठा आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील व्यवसायांवर परिणामपुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 नवीन ईव्ही चार्जिंग पॉइंट्स
Home महत्वाची बातमी उच्च न्यायालयाचा मराठा आंदोलकांना अल्टिमेटम
उच्च न्यायालयाचा मराठा आंदोलकांना अल्टिमेटम
मुंबईतील (mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस. या आंदोलनाच्या विरोधातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात दुपारी बारा वाजता सुनावणी झाली.
आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांच्या मराठा आंदोलनाला परवानगी नाही. त्यामुळे पुढील दोन तासात, अर्थात आज मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई सुरळीत करा, आंदोलकांना आदेशाचे पालन करायला सांगा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी लागेल.
मनोज जरांगे पाटील यांना जबर दंड लावण्याचाही आदेश आम्हाला द्यावा लागेल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) दिला आहे. तसेच मुंबईकरांना शांतपणे त्यांचे जनजीवन जगू द्या, असंही कोर्ट म्हणाले.
केवळ पाच हजार जणांना परवानगी असताना काय काळजी घेतली? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. आंदोलकांकडे परवानगी नाही, त्यामुळे दोन वाजून 40 मिनिटांपर्यंत तात्काळ जागा रिकामी करा, आम्हाला तीन वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत झालेलं हवं, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन आढावा घेऊ, असं कोर्टाने निक्षून सांगितलं.
यापूर्वी पाचशे मोर्चे काढले, पण कधीही अशी परिस्थिती उद्भवली नाही, यापुढे कोणतेही आंदोलक बेशिस्तपणे वागणार नाहीत, याची हमी देऊ, असे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. स्वाती साठे यांच्या खंडपीठासमोर म्हणणे मांडले. खंडपीठाने दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी ठेवली.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना कोर्टाच्या सूचनांची माहिती दिली. मात्र मनोज जरांगेंनी सूचना दिल्याशिवाय इथून इंचभरही न हलण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
याआधी, मुंबई पोलिसांनी (mumbai police) आंदोलकांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस सकाळीच बजावली होती. मात्र त्यानंतरही मनोज जरांगे किंवा मराठा आंदोलकांनी कुठलीही हालचाल केली नाही. आता कोर्टाने फटकारताच आंदोलक काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेहेही वाचा
मराठा आंदोलनाचा दक्षिण मुंबईतील व्यवसायांवर परिणाम
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 नवीन ईव्ही चार्जिंग पॉइंट्स