हिजबुल्लाचा कमांडर लेबनॉन हल्ल्यात ठार
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल सध्या अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. गाझापट्टीतील हमासचा खात्मा करण्यासाठी इस्रायल संरक्षण दल (आयडीएफ) सातत्याने हल्ले करत आहे. याचदरम्यान आयडीएफच्या सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अल-हज रदवान फोर्सचा मध्यवर्ती कमांडर अली मुहम्मद अल-दब्स याच्यासह त्याचा सहकारी हसन इब्राहिम इसा आणि अन्य काही जणांचा खात्मा केल्याचे सांगण्यात आले. अल-दब्स हा मार्च 2023 मध्ये उत्तर इस्रायलमध्ये असलेल्या मेगिद्दो जंक्शनवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. हिजबुल्लाहच्या अनेक दहशतवादी कारवायांचे नेतृत्व करण्याबरोबरच इस्त्रायलविरोधी धोरण राबविणे आणि अंमलात आणण्यात तो सक्रियपणे कार्यरत असल्याचे यापूर्वी उघड झाले होते. त्यामुळेच आयडीएफने त्याला लक्ष्य केले.
Home महत्वाची बातमी हिजबुल्लाचा कमांडर लेबनॉन हल्ल्यात ठार
हिजबुल्लाचा कमांडर लेबनॉन हल्ल्यात ठार
वृत्तसंस्था/ तेल अवीव इस्रायल सध्या अनेक आघाड्यांवर युद्ध लढत आहे. गाझापट्टीतील हमासचा खात्मा करण्यासाठी इस्रायल संरक्षण दल (आयडीएफ) सातत्याने हल्ले करत आहे. याचदरम्यान आयडीएफच्या सैन्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अल-हज रदवान फोर्सचा मध्यवर्ती कमांडर अली मुहम्मद अल-दब्स याच्यासह त्याचा सहकारी हसन इब्राहिम इसा आणि अन्य काही जणांचा खात्मा केल्याचे सांगण्यात आले. अल-दब्स हा मार्च 2023 मध्ये उत्तर […]