‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी

कोलकाता : गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हिरोमोटो कॉर्प कंपनीने 4 लाख 68 हजार 410 वाहनांची विक्री केली आहे. यामध्ये देशांतर्गत विक्री आणि निर्यातीचा समावेश आहे. फेब्रुवारी 2023 च्या तुलनेमध्ये 19 टक्के की वाढ दर्शवली गेली आहे.  फेब्रुवारी 2023 मध्ये 3 लाख 94 हजार 460 वाहनांची विक्री करण्यात आली होती. देशातील आघाडीवरची दुचाकी विक्रेती कंपनी म्हणून हिरो […]

‘हिरो’ने विकल्या 4 लाख 68 हजार दुचाकी

कोलकाता :
गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हिरोमोटो कॉर्प कंपनीने 4 लाख 68 हजार 410 वाहनांची विक्री केली आहे. यामध्ये देशांतर्गत विक्री आणि निर्यातीचा समावेश आहे. फेब्रुवारी 2023 च्या तुलनेमध्ये 19 टक्के की वाढ दर्शवली गेली आहे.  फेब्रुवारी 2023 मध्ये 3 लाख 94 हजार 460 वाहनांची विक्री करण्यात आली होती. देशातील आघाडीवरची दुचाकी विक्रेती कंपनी म्हणून हिरो मोटोकॉर्पचा उल्लेख केला जातो. मागच्या महिन्यामध्ये कंपनीच्या वाहन निर्यातीमध्ये 90 टक्के वाढ नोंदलेली आहे. 23 हजार 153 वाहनांची निर्यात मागच्या महिन्यात कंपनीने केली आहे.