साळगावात आजपासून ‘वारसा महोत्सव’
संस्कृती-सर्जनशीलतेचा मिलाफ : बँड शो, फॅशन शो, लोककला,हेमा सरदेसाईंचे लाइव्ह म्युझिक,पुस्तके, फोटो, खाद्यपदार्थ स्टॉल्स
पणजी : गोव्याचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करतानाच स्थानिक आणि पर्यटकांमध्ये सामूदायिक भावना वाढविणे तसेच राज्याच्या परंपरेचे सार अनुभवण्याच्या उद्देशाने आयोजित गोवा वारसा महोत्सव आज शुक्रवार 24 मेपासून प्रारंभ होत आहे. गोवा पर्यटन खात्यातर्फे आयोजित हा तीन दिवसीय महोत्सव साळगाव येथील फुटबॉल मैदानावर होणार आहे. पर्यटन संचालक सुनील अंचिपका यांनी काल गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संस्कृती-सर्जनशीलतेचा मिलाफ
हा महोत्सव म्हणजे गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जगासोबत शेअर करणारा परंपरा आणि सर्जनशीलतेचा एक सुंदर मिलाफ ठरणार असून पारंपरिक नृत्यांच्या मोहक सादरीकरणापासून अस्सल पाककृतीपर्यंतच्या सर्व प्रकारांमध्ये गोव्याच्या संस्कृतीचे सौंदर्य प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक अनुभव हा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चालीरीतींचा उत्सव आहे, असे अंचिपका म्हणाले.
बँड, फॅशन शो, लोककला
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यानंतर ‘स्काय हाय’ आणि ‘प्युअर मॅजिक’ या बँडचे सादरीकरण होईल. पर्यटकांसह स्थानिकांनाही पारंपरिक फॅशन शो पाहण्याची संधी मिळेल. त्याशिवाय प्रसिद्ध लोककलाकार कांता गावडे यांच्या पथकाकडूनही पारंपरिक नृत्याचे सादरीकरण होणार आहे.
हेमा सरदेसाईंचे लाइव्ह म्युझिक
दि. 25 रोजी प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांचे लाइव्ह म्युझिकच्या माध्यमातून समकालीन आवाज आणि गोव्याच्या संगीत परंपरा यांचे मिश्रणाचा आविष्कार अनुभवायला मिळेल. समारोपाच्या दिवशी 26 मे रोजी ट्वेंटी फोर के इंडिया, ट्रुली युअर्स आणि आर्चिज, द्वारे सादरीकरण होणार आहे. त्याशिवाय पारंपरिक नृत्य, मिमिक्री आणि हास्य प्रहसनांसह विविध सांस्कृतिक उपक्रमांचा आनंदही उपस्थितांना घेता येणार आहे.
पुस्तके, फोटो, खाद्यपदार्थ स्टॉल्स
महोत्सव स्थळी पुस्तकांचे स्टॉल्स, फोटो गॅलरी, दृश्यात्मक कलांचे देखावे तसेच खाद्यप्रेमींसाठी गोव्याच्या पारंपरिक खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. कलाप्रेमी रसिकांनी या भव्य उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस उपसरव्यवस्थापक दीपक नार्वेकर, उपसंचालक राजेश काळे आदी अधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी साळगावात आजपासून ‘वारसा महोत्सव’
साळगावात आजपासून ‘वारसा महोत्सव’
संस्कृती-सर्जनशीलतेचा मिलाफ : बँड शो, फॅशन शो, लोककला,हेमा सरदेसाईंचे लाइव्ह म्युझिक,पुस्तके, फोटो, खाद्यपदार्थ स्टॉल्स पणजी : गोव्याचा वैभवशाली सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करतानाच स्थानिक आणि पर्यटकांमध्ये सामूदायिक भावना वाढविणे तसेच राज्याच्या परंपरेचे सार अनुभवण्याच्या उद्देशाने आयोजित गोवा वारसा महोत्सव आज शुक्रवार 24 मेपासून प्रारंभ होत आहे. गोवा पर्यटन खात्यातर्फे आयोजित हा तीन दिवसीय महोत्सव साळगाव येथील […]