हेमंत सोरेनचे अटक प्रकरण पोहोचले सर्वोच्च न्यायालयात

आज होणार महत्त्वाची सुनावणी वृत्तसंस्था /नवी दिल्ली, रांची झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचे प्रकरण जोर धरू लागले आहे. हेमंत सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या अटकेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला आहे. या मुद्यावर सरन्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. सॉलिसिटर जनरल यांनी या प्रकरणात सांगितले की, अटकेविरोधात उच्च न्यायालयात आज म्हणजेच गुऊवारी सकाळी […]

हेमंत सोरेनचे अटक प्रकरण पोहोचले सर्वोच्च न्यायालयात

आज होणार महत्त्वाची सुनावणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली, रांची
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचे प्रकरण जोर धरू लागले आहे. हेमंत सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी त्यांच्या अटकेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर मांडला आहे. या मुद्यावर सरन्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. सॉलिसिटर जनरल यांनी या प्रकरणात सांगितले की, अटकेविरोधात उच्च न्यायालयात आज म्हणजेच गुऊवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे, यावर कपिल सिब्बल म्हणाले की, आम्ही उच्च न्यायालयाचा मुद्दा मागे घेऊ. हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे, हेमंत सोरेनच्या अटकेपासून रांचीमध्ये खळबळ उडाली आहे. हेमंत सोरेन यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यादृष्टीने न्यायालयाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना दुपारी 3 वाजता दिनेश राय यांच्या न्यायालयात हजर केले जाऊ शकते. अटकेनंतर हेमंत सोरेन यांना रिमांडवर घेण्यासाठी ईडी प्रयत्न करत आहे. हेमंत सोरेनने अटक होण्यापूर्वी एक व्हिडिओ शूट केला ज्यामध्ये त्याने स्वत:ला निर्दोष घोषित केले. मी अटकेला घाबरत नाही, मी शिबू सोरेनचा मुलगा आहे, संघर्ष माझ्या रक्तात आहे, असे हेमंत सोरेन व्हिडिओमध्ये सांगत आहेत. आम्ही लढू आणि जिंकू. ज्या जमिनीसाठी आरोप केले जात आहेत, त्या जमिनीत माझ्या नावाचा कुठेही पत्ता नाही. बुधवारी अटक झाल्यानंतर हेमंत सोरेन रात्रभर ईडीच्या कोठडीत होते. हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन गुऊवारी सकाळी ईडी कार्यालयात पोहोचल्या.