शहर-ग्रामीण परिसरात पावसाचा रुद्रावतार

जनजीवन विस्कळीत : मार्कंडेय नदी काठावरील हजारो एकर शेती पाण्याखाली बेळगाव : सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने शहरासह संपूर्ण ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.  नदी-नाल्याच्या परिसराला पूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारीही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या चार दिवसापासून संततधार पावसाला सुऊवात […]

शहर-ग्रामीण परिसरात पावसाचा रुद्रावतार

जनजीवन विस्कळीत : मार्कंडेय नदी काठावरील हजारो एकर शेती पाण्याखाली
बेळगाव : सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने शहरासह संपूर्ण ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले.  नदी-नाल्याच्या परिसराला पूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारीही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या चार दिवसापासून संततधार पावसाला सुऊवात झाली होती. त्यानंतर सोमवारी रात्री तर मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. दरम्यान जोरदार वाराही वाहत असून हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने झोडपून काढल्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणीच पाणी झाले आहे उपनगरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पाण्याला वाट करून देण्यासाठी अनेकांना दिवसभर कसरत करावी लागली. सखल भागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचून होते. पावसाचा जोर पाहता ‘यंदा खूप झाला पाऊस’ असेच आता सारे  म्हणू लागले आहेत.
शेतकऱ्यांना मोठा फटका
धुवाधार पावसामुळे बळ्ळारी नाला, मार्कंडेय नदी परिसरातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे यावषीही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  या धुवाधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते उखडले आहेत. या उखडलेल्या रस्त्यांवर डबके तयार झाले आहे. त्यामधून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. डबक्मयामध्ये दुचाकी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या 24 तासांत पावसाचा जोर वाढला असून बेळगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये पाणीच पाणी झाले आहे. शिवारे पाण्याने तुडुंब भरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शिवारात जाणेही अवघड झाले आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे गटारी पाण्याने तुडुंब भरून वहात होत्या. अनेक ठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यावरून वहात होते. नेहमीच जुन्या पी. बी. रोडवर पाणी साचून राहते. अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते. अनेकांच्या दुकानात पाणी गेल्याने दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
जुन्या पी. बी. रोड, गांधीनगर, नानावाडी, मराठा कॉलनी, मंडोळी रोड परिसरात पाणी साचून रहात होते. संततधार पावसामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे समस्या निर्माण झाली होती. लेंडी, बळ्ळारी नाल्याला अधिक पाणी वाढल्याने त्या नाल्यातील पाणी शिवारात जाऊन मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, भाजी विक्रेते यांची तारांबळ उडाली. मंगळवार असल्यामुळे बाजारपेठ बंद राहिली तरी छोटे व्यापारी मंगळवारी आपले व्यवसाय सुरू ठेवतात. मात्र पावसामुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील ग्राहकांनी पाठ फिरविली होती.