महाराष्ट्रासह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालचा उपसागरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. येत्या 24 तासात हे वारे वायव्य दिशेला सरकणार असून वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण व गोवा किनारपट्टीसह मराठवाडा व विदर्भात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला होता. आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही हा जोर कायम राहणार आहे.  हवामान विभागाचा अंदाज काय ? हवामान विभागाच्या अंदाजानुसार, समुद्राच्या तळाशी सुरू असलेल्या मान्सूनच्या द्रोणीय परिस्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. राजस्थानच्या मध्य भागामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दोन सप्टेंबर पासून बंगालच्या खाडीवर नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवलय. पुढील सात दिवसात गुजरात तसेच कोकण व गोवा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा भागात तुफान पावसाची शक्यता आहे. दोन व तीन सप्टेंबर रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून तीन-चार व पाच सप्टेंबर रोजी कोकण व गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे . पुढील चार दिवस कसे जाणार? हवामान विभागाने आज पासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी हाय अलर्ट दिले आहेत. आज विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण मराठवाडा उर्वरित विदर्भ व नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीवरही आज जोरदार पावसाची शक्यता असून पुणे सातारा आणि कोल्हापूर घाट माथ्यावरही येलो अलर्ट देण्यात आलाय. 3 सप्टेंबर : सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट आहे .मुंबई, ठाणे, पालघर ,नाशिक ,नगर ,पुणे, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे ,जळगाव जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे . 4 सप्टेंबर : रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे पुणे, सातारा व कोल्हापूर तसेच नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट. सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, नाशिक, नगर ,पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे ,नंदुरबार व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय . 5 सप्टेंबर : रायगड व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज कलर असून मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे. नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे . उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही .हेही वाचा एल्फिन्स्टन पूल 10 सप्टेंबरपासून बंद

महाराष्ट्रासह मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालचा उपसागरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. येत्या 24 तासात हे वारे वायव्य दिशेला सरकणार असून वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण व गोवा किनारपट्टीसह मराठवाडा व विदर्भात तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढलेला होता. आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही हा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाचा अंदाज काय ?हवामान विभागाच्या अंदाजानुसार, समुद्राच्या तळाशी सुरू असलेल्या मान्सूनच्या द्रोणीय परिस्थितीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे.राजस्थानच्या मध्य भागामध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दोन सप्टेंबर पासून बंगालच्या खाडीवर नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवलय.पुढील सात दिवसात गुजरात तसेच कोकण व गोवा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा भागात तुफान पावसाची शक्यता आहे. दोन व तीन सप्टेंबर रोजी कोकण गोवा मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून तीन-चार व पाच सप्टेंबर रोजी कोकण व गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे .पुढील चार दिवस कसे जाणार?हवामान विभागाने आज पासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात विविध ठिकाणी हाय अलर्ट दिले आहेत. आज विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण मराठवाडा उर्वरित विदर्भ व नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिला आहे. कोकण किनारपट्टीवरही आज जोरदार पावसाची शक्यता असून पुणे सातारा आणि कोल्हापूर घाट माथ्यावरही येलो अलर्ट देण्यात आलाय.3 सप्टेंबर : सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट आहे .मुंबई, ठाणे, पालघर ,नाशिक ,नगर ,पुणे, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे ,जळगाव जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे .4 सप्टेंबर : रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे पुणे, सातारा व कोल्हापूर तसेच नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट.सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, नाशिक, नगर ,पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे ,नंदुरबार व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय .5 सप्टेंबर : रायगड व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज कलर असून मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे.नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे . उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही .हेही वाचाएल्फिन्स्टन पूल 10 सप्टेंबरपासून बंद

Go to Source