राज्यात सलग 11 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात 21 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे. सलग 11 दिवस पाऊस कोसळणारपंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहणार आहे. मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे. राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस धो-धो पाऊस कोसळणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे. तर राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचे डख म्हणाले. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट राहावं असं आवाहन पंजाबराव डख यांनी केलं आहे.देशासह राज्यात चांगला पाऊसयावर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपे७ा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाडा आणि विदर्भात पिकांना फटकागेल्या काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) आणि विदर्भात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. हेही वाचाहवामानाचा आता अचूक अंदाज सांगता येणार
नवी मुंबई: फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी एलईडी दिवे बदलणार
Home महत्वाची बातमी राज्यात सलग 11 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात सलग 11 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात 21 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा इशारा पंजाबराव डख यांनी दिला आहे.
सलग 11 दिवस पाऊस कोसळणार
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रभरात कोरडं हवामान राहणार आहे. मात्र त्यानंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे.
राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस धो-धो पाऊस कोसळणार असल्याची माहिती डख यांनी दिली आहे.
तर राज्यातील नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचे डख म्हणाले. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या भागातील नागरिकांनी अलर्ट राहावं असं आवाहन पंजाबराव डख यांनी केलं आहे.
देशासह राज्यात चांगला पाऊस
यावर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपे७ा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पिकांना फटका
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) आणि विदर्भात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत.हेही वाचा
हवामानाचा आता अचूक अंदाज सांगता येणारनवी मुंबई: फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी एलईडी दिवे बदलणार