मुंबई आणि परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई आणि उपनगरात बुधवारपासून पावसाने दिलासा दिला आहे. गुरुवारी सकाळपासून मुंबईच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन तासांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.गुरुवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. उपनगरातील बोरीवली, दहिसर, वांद्रे परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत नसला तरी हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, येत्या दोन ते तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा पाऊस सुमारे तासभर राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याचवेळी मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उपनगरातील बोरीवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव या भागात अधिक पाऊस पडत आहे.यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतली होती. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा सामना करावा लागला. दरम्यान, बुधवारपासून मुंबई आणि उपनगरात पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात दव निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे.नवी मुंबईत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारामुंबईसह नवी मुंबई परिसरातही आज मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. सकाळपासूनच नवी मुंबईतील कामोठे, पनवेल, बेलापूर, खारघर परिसरात पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सुमारे तासभर सुरू राहणार आहे. येत्या एक तासात डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिसरात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे.हेही वाचानवी मुंबईकरांसाठी पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर
अंबरनाथकरांना 1 दिवस, बदलापूरमध्ये 2 दिवसाआड पाणीपुरवठा
Home महत्वाची बातमी मुंबई आणि परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई आणि परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई आणि उपनगरात बुधवारपासून पावसाने दिलासा दिला आहे. गुरुवारी सकाळपासून मुंबईच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन तासांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गुरुवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. उपनगरातील बोरीवली, दहिसर, वांद्रे परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत नसला तरी हलक्या सरी कोसळत आहेत.
दरम्यान, येत्या दोन ते तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा पाऊस सुमारे तासभर राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्याचवेळी मुंबईत पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उपनगरातील बोरीवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव या भागात अधिक पाऊस पडत आहे.
यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतली होती. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा सामना करावा लागला. दरम्यान, बुधवारपासून मुंबई आणि उपनगरात पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरणात दव निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईत मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह नवी मुंबई परिसरातही आज मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. सकाळपासूनच नवी मुंबईतील कामोठे, पनवेल, बेलापूर, खारघर परिसरात पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सुमारे तासभर सुरू राहणार आहे.
येत्या एक तासात डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिसरात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या भागात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे.हेही वाचा
नवी मुंबईकरांसाठी पाणीकपातीचे वेळापत्रक जाहीरअंबरनाथकरांना 1 दिवस, बदलापूरमध्ये 2 दिवसाआड पाणीपुरवठा