संतिबस्तवाड-मच्छे परिसरात मुसळधार पाऊस

मात्र परिसरात पावसाची हुलकावणी : कडक उन्हामध्ये काही जणांना मिळाला अल्पप्रमाणात गारवा वार्ताहर /किणये संतिबस्तवाड, मच्छे, पिरनवाडी परिसरात बुधवारी दुपारी पाऊस झाला. सुमारे अर्धा तास या परिसरात पाऊस झाल्यामुळे कडक उन्हात थोड्या प्रमाणात गारवा निर्माण झाला. यामुळे या परिसरातील नागरिक सुखावले होते. बेळगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. कडक उन्हाचे चटके सोसावे […]

संतिबस्तवाड-मच्छे परिसरात मुसळधार पाऊस

मात्र परिसरात पावसाची हुलकावणी : कडक उन्हामध्ये काही जणांना मिळाला अल्पप्रमाणात गारवा
वार्ताहर /किणये
संतिबस्तवाड, मच्छे, पिरनवाडी परिसरात बुधवारी दुपारी पाऊस झाला. सुमारे अर्धा तास या परिसरात पाऊस झाल्यामुळे कडक उन्हात थोड्या प्रमाणात गारवा निर्माण झाला. यामुळे या परिसरातील नागरिक सुखावले होते. बेळगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. कडक उन्हाचे चटके सोसावे लागत असल्यामुळे सारेजण वैतागून गेलेले आहेत. कधी एकदा पाऊस येईल आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण होईल, याची साऱ्यांनाच आशा लागून राहिली होती. बुधवारी काही परिसरात पावसाने थोड्या प्रमाणात का होईना हजेरी लावली. तीव्र उन्हामुळे तालुक्याच्या बऱ्याच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. देसूर परिसरात वीट उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. बुधवारी दुपारी या भागातही पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे विटांवर ताडपत्री झाकण्यासाठी वीट कामगारांची धावपळ सुरू झाली होती.