ग्रामीण भागात जोरदार वादळी पाऊस
शहरात मात्र शिडकाव : मशागतीला पोषक, बळीराजा सुखावला
बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून वळीव पावसाची जोरदार बरसात होत आहे. गुऊवारीही शहरामध्ये वळिवाचे आगमन झाले. शहर परिसरात दुपारपासूनच पावसाचा शिडकाव झाला. मात्र शहराच्या पूर्व व दक्षिणच्या ग्रामीण भागाला पावसाचे पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. गुऊवारी उष्म्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे जोरदार पाऊस होणार अशी शक्यता होती. ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला तरी शहरावर मात्र शिडकावच झाला आहे. ढगांचा गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे दुपारीच आगमन झाले. शहराच्या पूर्व भागाला पावसाने झोडपून काढले. गुऊवारी दुपारपासूनच शहरामध्ये पावसाचा शिडकाव सुरू झाला. त्यामुळे फेरीवाले, भाजी विक्रेते तसेच इतर बैठे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. यातच ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट असल्यामुळे अनेकांनी घरी जाणेच पसंत केले. शहरात पावसाला जोर नसला तरी ढगाळ वातावरण मात्र कायम होते. यामुळे गारव्या ऐवजी उष्म्यामध्येच वाढ झाली होती. ग्रामीण भागामध्ये मात्र ढगाळ वातावरणाबरोबरच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वळिवाच्या हजेरीने बळीराजा सुखावला असून हा पाऊस मशागतीसाठी पोषक ठरला आहे.
मोठ्या प्रमाणावर नुकसान
सांबरा : बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गुऊवारी वादळी वाऱ्यासह व विजांच्या गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा ,सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होन्निहाळ ,पंत बाळेकुंद्री, मारीहाळ आदी भागांमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. हा पाऊस इतका जबरदस्त होता की सखल भागामध्ये बघता बघता पाणी झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर विद्युतखांबही मोडून पडले होते. मुतगानजीकच्या पेट्रोलपंपजवळ एक झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. संबंधितांनी तातडीने वृक्ष हटवून रस्ता खुला केला. बाळेकुंद्री खुर्द येथील मराठी प्राथमिक शाळेतील मोठे वृक्ष उन्मळून पडले होते. शाळेसमोरील एक विद्युतखांबही मोडून पडला होता. सांबरा येथे झाड विद्युततारांवर कोसळल्याने टीसीसह विद्युतखांब माऊती गल्लीच्या कोपऱ्यावर कोसळल्याने एका दुचाकीचे नुकसान झाले. त्यानंतर बराच उशीर गावांमध्ये विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यात्रेसाठी घालण्यात आलेले अनेक मंडप कोसळून ग्रामस्थांची बरीच गैरसोय झाली. तसेच यात्रेसाठी आलेल्या काही दुकानधारकांचेही नुकसान झाले आहे.
Home महत्वाची बातमी ग्रामीण भागात जोरदार वादळी पाऊस
ग्रामीण भागात जोरदार वादळी पाऊस
शहरात मात्र शिडकाव : मशागतीला पोषक, बळीराजा सुखावला बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून वळीव पावसाची जोरदार बरसात होत आहे. गुऊवारीही शहरामध्ये वळिवाचे आगमन झाले. शहर परिसरात दुपारपासूनच पावसाचा शिडकाव झाला. मात्र शहराच्या पूर्व व दक्षिणच्या ग्रामीण भागाला पावसाचे पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले. गुऊवारी उष्म्यामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे […]