महाराष्ट्रात उष्णतेचा कहर,तापमानात वाढ
उन्हाळा सुरु झाला असून राज्यभरात उष्णतेचा कहर सुरु आहे. तापमानात वाढ झाली असून पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मध्ये झाली असून येथील तापमान 42.3 अंश सेल्सिअस होते. तसेच डोंबिवली जवळचे पलावा परिसरात 41.3 अंश सेल्सिअस, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण मुंब्रा शहरात तापमान 40 अंश सेल्सिअस होते. सध्या विदर्भ होरपळून निघत आहे. प्रादेशिक हवामान खात्यानं विदर्भात उष्णतेची लाट असल्याचे जाहीर केले आहे.गरज असल्यास घरातून बाहेर पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ALSO READ: पुणे : इंद्रायणी नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेची लाट आली असून इथे बुधवारी तापमान 37.2 अंश सेल्सिअस नोंदले गेला. तर गुरुवारी तापमानात वाढ होऊन इथे तापमान 39 .2 नोंदले गेले .
ALSO READ: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ३००० नवीन बस जोडल्या जाणार
चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच राज्यातील पुण्यासह जिल्ह्यात उष्णतेच्या झळा लागत आहे. लोहगाव परिसरात गुरुवारी 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात पुणे आणि विदर्भासह काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
Edited By – Priya Dixit
ALSO READ: ठाण्यात होळी उत्सवादरम्यान किशोरवयीन मुलावर हल्ला
