विदर्भात आजही उष्णतेची लाट, उद्यापासून पूर्व विदर्भात पावसाचा अलर्ट

उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रातील विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा परिणाम पाहायला मिळत आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांपासून विदर्भ उन्हात होरपळून निघत असल्याचं पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळं विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 …

विदर्भात आजही उष्णतेची लाट, उद्यापासून पूर्व विदर्भात पावसाचा अलर्ट

उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रातील विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा परिणाम पाहायला मिळत आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांपासून विदर्भ उन्हात होरपळून निघत असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

उष्णतेच्या लाटेमुळं विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांचया जवळ पोहोचल्याचं पाहायला मिळालं.

 

शनिवारी 31 मे रोजीही विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे.दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे.

 

त्यानंतर 1 जूनपासून मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आले. विदर्भात पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

 

प्रामुख्यानं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

त्याशिवाय 2 जूनलाही विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Published By- Dhanashri Naik 

 

Go to Source