Kolhapur | हृदयद्रावक घटना : आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने लेकीचाही मृत्यू
करवीर तालुक्यात दुहेरी अंत्यसंस्काराने शोककळा
सडोली खालसा : आईच्या मृत्यूचा धक्का, सहन न झाल्याने मृत्यूनंतर लेकीचा मृत्यू झालेली हृदय द्रावक घटना शुक्रवार रात्री दहा वाजता बाचणी तालुका करवीर येथे घडली. हौसाबाई गणपती पाटील 72व सुवर्णा विठ्ठल राजगिरे वय 47 अशी मयत माय लेकीची नावे आहेत.
बाचणी तालुका करवीर येथील वयोवृद्ध श्रीमती हौसाबाई गणपती पाटील वय 72 या गेली तीन आठवडे आजारी होत्या. पतीचे छत्र हरवल्याने तसेच मुलगा नसल्यामुळे त्यांची सेवा त्यांच्या चौघी मुली करत होत्या. सर्वच मुली लग्न झाल्याने आपापल्या घरी संसार करत आहेत आणि आपल्या वयोवृद्ध आईकडे लक्ष देत असत..
आई आजारी असल्यामुळे अंथरूणात होती आईची सेवा करण्यासाठी सर्वच मुली हजर होत्या परंतु दुर्दैवाने शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान आई हौसाबाई यांचा मृत्यू झाला. त्यावेळी सेवा करणाऱ्या सुवर्णा विठ्ठल राजगिरे रा.चुये यांना आईचा मृत्यू धक्का सहन न झाल्याने अवघ्या पंधराव्या मिनिटात तिचाही मृत्यू झाला .
तिच्यावर चुये.ता करवीर येते अंतिम संस्कार करण्यात आले तिच्या पश्चात पती दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.गेली आठ दहा दिवस सेवा करणारे मुलगी सुवर्णा हिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
Home महत्वाची बातमी Kolhapur | हृदयद्रावक घटना : आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने लेकीचाही मृत्यू
Kolhapur | हृदयद्रावक घटना : आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने लेकीचाही मृत्यू
करवीर तालुक्यात दुहेरी अंत्यसंस्काराने शोककळा सडोली खालसा : आईच्या मृत्यूचा धक्का, सहन न झाल्याने मृत्यूनंतर लेकीचा मृत्यू झालेली हृदय द्रावक घटना शुक्रवार रात्री दहा वाजता बाचणी तालुका करवीर येथे घडली. हौसाबाई गणपती पाटील 72व सुवर्णा विठ्ठल राजगिरे वय 47 अशी मयत […]
