सुनहरी बाग मशीद प्रकरणी गुरुवारी सुनावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीतील सुनहरी बाग मशीद पाडण्याच्या ‘एनडीएमसी’च्या नोटीसविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या न्यायालयात सुरू आहे. न्यायाधीश रजेवर असल्याने प्रकरणाची सुनावणी आता गुरुवार, 11 जानेवारीला होणार आल्याचे मशिदीच्या बाजूचे वकील फिरोज इक्बाल यांनी सांगितले. एनडीएमसीने दिलेली नोटीस संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले. […]

सुनहरी बाग मशीद प्रकरणी गुरुवारी सुनावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील सुनहरी बाग मशीद पाडण्याच्या ‘एनडीएमसी’च्या नोटीसविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या न्यायालयात सुरू आहे. न्यायाधीश रजेवर असल्याने प्रकरणाची सुनावणी आता गुरुवार, 11 जानेवारीला होणार आल्याचे मशिदीच्या बाजूचे वकील फिरोज इक्बाल यांनी सांगितले. एनडीएमसीने दिलेली नोटीस संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले. 172 वर्षे जुनी मशीद पाडण्याचा प्रस्ताव देत दिल्ली नगर परिषदेने 24 डिसेंबरला नोटीस बजावली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. या प्रस्तावाविरोधात मशिदीच्या इमामाने 30 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्लीतील ही मशीद सुमारे 125 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळावर बांधली गेली आहे.