म्हादईप्रश्नी याचिकेवर आज सुनावणी शक्य

पणजी : म्हादई प्रकरणी राज्य सरकारने सादर केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणी आज बुधवार दि. 24 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे.  याचिका बुधवारच्या यादीत समाविष्ट करण्यात आली असून कर्नाटक, महाराष्ट्र यांनी सादर केलेल्या याचिकाही आजच सुनावणीस घेण्यात येणार आहेत. म्हादईप्रश्नी सर्व याचिका एकत्र करण्यात आल्या असून त्यावर आज सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी अशाप्रकारे […]

म्हादईप्रश्नी याचिकेवर आज सुनावणी शक्य

पणजी : म्हादई प्रकरणी राज्य सरकारने सादर केलेल्या अवमान याचिकेवरील सुनावणी आज बुधवार दि. 24 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे.  याचिका बुधवारच्या यादीत समाविष्ट करण्यात आली असून कर्नाटक, महाराष्ट्र यांनी सादर केलेल्या याचिकाही आजच सुनावणीस घेण्यात येणार आहेत. म्हादईप्रश्नी सर्व याचिका एकत्र करण्यात आल्या असून त्यावर आज सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी अशाप्रकारे दोन-तीन वेळा म्हादईची याचिका एका ठराविक दिवशी सुनावणीसाठी यादीत समाविष्ट करण्यात आली होती परंतू सुनावणी झालीच नसल्याचे समोर आले होते. या सुनावणीवर म्हादईचे गोव्याचे भवितव्य अवलंबून आहे.