केजरीवालांच्या जामीन अर्जावर आता 14 जुनला सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नियमित जामिनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राउज अॅव्हेन्यूच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी 14 जूनपर्यंत टाळली आहे.
यावेळी ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी युक्तिवाद मांडला. तर केजरीवालांच्या वतीने वरिष्ठ वकील हरिहरन यांनी बाजू मांडली आहे. दिल्ली सत्र न्यायालयाचे कामकाज उन्हाळी सुटीनिमित्त काही दिवस बंद राहणार आहे. यामुळे न्यायालयाने याप्रकरणी 14 जून रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने देखील पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने राउज अॅव्हेन्यू न्यायालयात दाखल आरोपपत्रात बीआरएस. नेत्या के. कविता यांनाही आरोपी केले आहे. यापूर्वी ईडीने कविता यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तर केजरीवालांनी 5 जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण पेले होते. त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना लोकसभा निवडणूक प्रचारासाठी 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता.
Home महत्वाची बातमी केजरीवालांच्या जामीन अर्जावर आता 14 जुनला सुनावणी
केजरीवालांच्या जामीन अर्जावर आता 14 जुनला सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नियमित जामिनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राउज अॅव्हेन्यूच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी 14 जूनपर्यंत टाळली आहे. यावेळी ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी युक्तिवाद मांडला. तर केजरीवालांच्या वतीने वरिष्ठ वकील हरिहरन यांनी बाजू मांडली आहे. दिल्ली […]